आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पॉझिटिव्ह मान्सून:देशात 12 टक्के अधिक पाऊस, लडाख वगळता देशात कुठे रिमझिम-कुठे मुसळधार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 35 दिवसांत देशातील 36 पैकी 21 राज्यांत सरासरी किंवा अधिक पाऊस

श्रावण सुरू होण्यापूर्वीच देशभर श्रावण सरी बरसू लागल्या आहेत. यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीच मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रविवारी लडाख वगळता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, बिहारसह ३६ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार पाऊस झाला. आतापर्यंत मान्सूनच्या ३५ दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. नियोजित ८ जुलै या तारखेपूर्वी १२ दिवस मान्सूनने देश व्यापला होता. ५ जुलैपर्यंत देशात २३२.२ मिमी पाऊस झाला, तर या तारखेपर्यंतच्या पावसाची सरासरी २०८.२ मिमी आहे. म्हणजे सरासरीपेक्षा १२ टक्के अधिक पाऊस झाला. ३६ राज्यांपैकी २१ मध्ये आतापर्यंत सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे.

कोरोनामुळे अस्वस्थ मुंबईत पावसाने हाल झाले. महानगरात तिसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने रस्त्यांवर तीन फूट पाणी साचले. वाहतूक विस्कळीत झाली. समुद्रातही दुसऱ्या दिवशी हाय टाइड होत्या. जुलैत देशात सरासरी ८१९ मिमी पाऊस पडतो. १ ते ५ जुलैदरम्यान ६७५ मिमी पाऊस झाला आहे.

इशारा : गुजरातसह ५ राज्यांत ४ दिवसांत मुसळधार

देशात वेगवेगळ्या भागांत पाच कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. यातील एक अनुपगड, सीकर, ग्वाल्हेर, सिधी, रांची, जमशेदपूरसह हल्दियापर्यंत आहे. दुसरा द. गुजरात ते कर्नाटक आहे. यामुळे गुजरात, प. बंगाल, ओडिशा, पूर्व उप्र, आंध्रात ४ दिवस जोरदार पाऊस पडेल. 

गुजरातेत मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला. रविवारी द्वारका जिल्ह्यातील खंभालियात रात्री ८ पर्यंत ४३४ मिमी म्हणजे १८ इंच पाऊस झाला. सायंकाळी ६ ते ८ पर्यंत १२ इंच पाऊस झाला. रात्री ८ वाजेपर्यंत राज्यातील २५१ पैकी १६३ तालुक्यांत पाऊस झाला आहे.

0