आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रात घोंगावतेय चक्रीवादळ:18 मे रोजी गुजरात किनाऱ्यावर धडक देणार 'ताैक्ते'; महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकातही मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळमध्ये एक दिवसपूर्वी 31 मार्चला धडकू शकते मान्सून

गुजरात आणि महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या 'ताैक्ते' चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 18 मे रोजी चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकेल. यावेळी, पावसासह 175 KMPH च्या वेगाने वारे वाहू शकतात. या वादळाचा परीणाम गुजरात आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही होऊ शकतो. म्यानमारने या चक्रीवादळाला ताैक्ते (Tauktae) असे नाव दिले आहे.

6 पॉइंटमध्ये समजून घ्या वादळाचा परीणाम

  • 15 मे रोजी लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. येथे 16 आणि 17 मे रोजी इतर ठिकाणांवर पावसाची शक्यता आहे.
  • तामिळनाडूच्या घाट जिल्ह्यामध्येही 16 मे रोजी तुफान पाऊस होऊ शकतो.
  • कर्नाटकच्या किनारपट्टी जिल्ह्यामध्ये या वादळाचा परीणाम होईल. येथे पावसासह जोरदार वारे वाहू शकतात.
  • कोकण आणि गोव्यामध्ये 15-16 मे रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे.
  • गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये 16-17 मे रोजी जोरदार पाऊस होऊ शकतो. 18 मेला कच्छमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
  • केरळचे पाच जिल्हे तिरुवनंतपुरम, कोलम, पठानामठिता, अलपुझा आणि एर्नाकुलममध्ये रेड अलर्ट जारी.
  • NDRF च्या 53 टीम अलर्टवर

NDRF चे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले की - केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र या किनारपट्टी भागात एनडीआरएफची 53 पथके तैनात आहेत.

केरळमध्ये एक दिवसपूर्वी 31 मार्चला धडकू शकते मान्सून
देशात यावेळी मान्सून एक दिवस आधीच धडकू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दक्षिण-पश्चिम मान्सून केरळला एक दिवस अगोदर म्हणजेच 31 मे रोजी पोहोचू शकते. हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, मान्सून साधारणत: 1 जून रोजी राज्यात धडकू करतो, परंतु यावेळी 24 तासांपूर्वी पोहोचण्याचा अंदाज आहे.

विभागाच्या मते, जून ते सप्टेंबर दरम्यान या वेळी पाऊस सामान्य राहण्याची शक्यता आहे. यावर्षी हवामानात 96-104% पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने सलग तिसर्‍या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी 2019-20 मध्येही सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला होता.

22 मे रोजी मॉन्सून बंगालच्या उपसागरात पोहोचेल
सध्याच्या अंदाजानुसार 22 मेपर्यंत नैऋत्य मॉन्सून अंदमान समुद्रापर्यंत पोहोचेल. यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावर पश्चिमी विक्षोभ मजबूत होत आहे. 20 मे पर्यंत ते बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचेल आणि मजबूत होईल. यामुळे 21 मेपासून बंगालच्या उपसागर आणि अंदमान येथे पाऊस पडणार आहे. 22 मे पर्यंत अंदमान आणि निकोबारच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे की देशात मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस दक्षिण अंदमान सागर येथून होते आणि त्यानंतर मान्सूनचे वारे वायव्य दिशेने बंगालच्या उपसागराकडे सरकतात.

बातम्या आणखी आहेत...