आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monsoon On 5 6 Days Holiday ... Now Only Bihar Uttar Pradesh And Hilly States Are Likely To Receive Torrential Rains

हवामान:मान्सून 5-6 दिवसांच्या सुट्टीवर... आता फक्त बिहार-उत्तर प्रदेश व डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनने ५-६ दिवसांचा ब्रेक घेतला आहे. मात्र, यूपी-बिहार आणि डोंगराळ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या उत्तरी सीमेचा पूर्वेकडील भाग हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पोहोचला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यांत या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल. तसेच बिहारवर एकचक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानात रविवारपर्यंत शुष्क हवामान कायम राहील. हवामान खात्यानुसार, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकातही या आठवड्यात पावसाची शक्यता खूपच कमी आहे. या राज्यांत तापमानात वाढ होईल. यामुळे हवेतील आर्द्रता वाढेल. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, १६ ऑगस्टनंतर मान्सून देशभरात पुन्हा सक्रिय होईल.

बातम्या आणखी आहेत...