आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monsoon On Kerala Tamil Nadu Threshold, Signs Of Arrival In Kerala At Any Moment

मान्सून 100 किमीवर:मान्सून केरळ-तामिळनाडूच्या उंबरठ्यावर, केरळात कोणत्याही क्षणी आगमनाची सुचिन्हे

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून केरळ-तामिळनाडूच्या उंबरठ्यावर आहे. कोणत्याही क्षणी त्याच्या आगमनाची वर्दी मिळू शकते. केवळ काही टप्पे पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य माेसमी वारे वाहू लागले आहेत. पाऊस, वारे व रेडिएशनच्या (उत्सर्जन) पातळीवरील टप्पे पूर्ण केल्यानंतरच केरळातील मान्सूनच्या आगमनाची पुष्टी केली जाते. शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. अर्थात आगमनाचा पहिला निकष पूर्ण झाला.

केरळ, लक्षद्वीप व कर्नाटकच्या १४ मोसमी केंद्रांपैकी ६० टक्के केंद्रांवर १० मेनंतर सलग दोन दिवसांपर्यंत २.५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर मान्सूनच्या आगमनाचा प्रमुख आधार मानले जाते. हा टप्पा केरळ, कर्नाटकची किनारपट्टी व लक्षद्वीपमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पूर्ण झाला आहे. आता हवामानतज्ज्ञांचे लक्ष वारे व रेडिएशनच्या मानकांच्या निगराणीकडे आहे. मान्सून श्रीलंका, मालदीव भागात आहे. भारताच्या अंदमान-निकोबारमध्ये मान्सून २१ मेला धडकले होते. त्यानंतर सामान्य गतीने त्याची पश्चिमोत्तर दिशेने वाटचाल सुरू आहे. मान्सूनची उत्तरेकडील सीमा सध्या कोमोरिन समुद्राच्या किनारपट्टीपासून १०० किमी अंतरावर आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची सामान्य तारीख एक जून आहे. यंदा हवामान विभागाने ३१ मे रोजी त्याच्या आगमनाचा अंदाज वर्तवला होता. खासगी हवामान संस्था स्कायमेटने ३० मे रोजी आगमनाची भविष्यवाणी केली होती. प्रशांत महासागरातील तापमान सरासरी ते ०.३ अंशांहून कमी आहे. म्हणूनच हा गारवा मान्सूनसाठी एक चांगली स्थिती म्हटले पाहिजे.

काय आहेत वारे, उत्सर्जनाचे निकष
- ६०० हेक्टा पास्कलच्या कमी दाबाच्या (सुमारे तीन किलोमीटर) उंचीपर्यंत पश्चिमेकडील वारे वाहत असावे. ही स्थिती ५५ अंश ते ८० अंश रेखांशापर्यंत व विषुववृत्तापासून १० अंश अक्षांशादरम्यान असावी लागते.
- त्यापैकी ७० अंशांहून ८० अंश पूर्व रेखांश व ५ अंश ते १० अंश उत्तर अक्षांशादरम्यान पृष्ठभागावर (९२५ हेक्टापास्कल) वाऱ्याचा वेग ताशी १५ ते २० नॉटिकल मैल असावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...