आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monsoon Rainfall In The Country Towards Average; Rainfall Will Exceed Average This Month: Meteorological Department; News And Live Updates

मान्सूनची V शेप रिकव्हरी:देशात मान्सूनचा पाऊस सरासरीच्या दिशेने; या महिन्यात पाऊस सरासरी ओलांडणार : हवामान विभाग

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • जोग धबधबा मनसोक्त कोसळू लागला

देशातील सर्व प्रमुख राज्यांत आता २४ तासांत किमान एकदा सरी असा क्रम सुरू झाला आहे. मान्सूनचा तिसरा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण होत आहे. याच्या परिणामी बुधवार ते शनिवारपर्यंत उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात २७ जुलैपर्यंत एकूण ४०८.५ मिमी पाऊस झाला असून साधारणपणे ही सरासरी ४१३.८ मिमी असते. म्हणजे आतापर्यंत फक्त १ टक्के पाऊस कमी झाला आहे. येत्या चार दिवसांत सलग पावसाची शक्यता पाहता ३१ जुलैपर्यंत देशातील पावसाची सरासरी ओलांडली जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

वास्तविक मान्सून दाखल झाला तेव्हा प्रारंभी चांगला पाऊस झाला. मात्र, नंतर दोन आठवडे पाऊस मध्य व उत्तर भारतात रेंगाळला. त्यामुळे देशात कमी पाऊस झाला. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसाचा फायदा होऊ शकला नाही. मात्र, मान्सूनने आता ही भरपाई केली आहे. पुढील काळातही मान्सूनचा पाऊस कमी होईल, अशी शक्यता नाही.

जोग धबधबा मनसोक्त कोसळू लागला
आतापर्यंत मान्सूनचा ४०८.५ मिमी पाऊस झाला, हा पाऊस सरासरीपेक्षा १% कमी; जुलैच्या मध्यात ८% कमी पाऊस झाला होता. ही भरपाई १५ दिवसांत झाली.

  • गेल्या वर्षी जुलैमध्ये १०% कमी पाऊस झाला होता. तर, मान्सूनने ८ जुलैच्या तुलनेत २६ जूनलाच संपूर्ण देश व्यापला होता. या वर्षी मान्सून ५ दिवस उशिरा १३ जुलै रोजी संपूर्ण देशांत दाखल झाला. असे असूनही जुलैमध्येच पाऊस सरासरी ओलांडणार आहे.
बातम्या आणखी आहेत...