आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monsoon Stay Extended For Another Two Weeks 9 Out Of 15 Weeks Dry, Compensation In Six Weeks

पाऊस:पंधरापैकी 9 आठवडे कोरडे, सहा आठवड्यांत भरपाई, केवळ 4 टक्के तूट, मान्सूनचा मुक्काम आणखी दोन आठवडे लांबला

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्माएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात ३ जून रोजी प्रवेश करणाऱ्या मान्सूनच्या मुक्कामास शनिवारी १०८ दिवस पूर्ण होतील. मान्सूनच्या १५ आठवड्यांच्या काळात ९ आठवडे कोरडे होते. परंतु सहा आठवड्यांत ही तूट भरून निघाली. आता देशभरात केवळ ४ टक्के घट राहिली आहे. हवामानतज्ज्ञ आर.के. जेनामणी म्हणाले, शुक्रवारी पश्चिमेकडील राजस्थानच्या पोखरणमधून मान्सूनच्या परतीला सुरुवात होते. ही मान्सूनच्या परतीची सामान्य तारीख होती. परंतु तूर्त तरी दोन आठवड्यांपर्यंत मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल अशी स्थिती दिसून येत नाही. पुढल्या दोन आठवड्यांपर्यंत किमान दोन वेळा मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊन आेडिशा, पश्चिम बंगालमधून उत्तर पश्चिमेच्या दिशेने त्याची वाटचाल होऊ शकते. त्याचा परिणाम गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानपर्यंत दिसू शकतो.

आयएमडीच्या म्हणण्यानुसार जूनपूर्वी तीन आठवड्यांनंतर जुलैमध्ये एका आठवड्यात, तर सप्टेंबरमध्ये दोन आठवड्यांत सरासरीहून दमदार पाऊस झाला. १५ सप्टेंबरला मान्सून आगमनास पूर्ण झालेल्या १५ आठवड्यांत ५३ टक्के जास्त पाऊस झाला.

15 वर्षांत केवळ ३ वेळा १५ सप्टेंबरपूर्वी परतला मान्सून
गेल्या १५ वर्षांत १२ वेळा मान्सून परतीची सुरुवात २१ सप्टेंबरनंतर झाली आहे. केवळ तीन वेळा मान्सूनची सुरुवात १५ सप्टेंबरपूर्वी झाली. मान्सून विलंबाने परतत असला तरी त्याचा पाऊसमानावर दुष्परिणाम होत नाही. चक्रीवादळाशी संबंधित घडामोडी घडल्यास परिणाम दिसू शकतो, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

76 टक्के जिल्ह्यांत सरासरी वा त्यापेक्षा जास्त पावसाची हजेरी
देशातील ७६ टक्के जिल्ह्यांत आता सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. चोवीस तासांपूर्वी उत्तर प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. बाराबंकीमध्ये १७६ मिमी, लखनऊमध्ये १२८ मिमी, पाऊस झाला. धर्मशाळेत ६०.४ मिमी, गुजरातच्या बडोद्यात ४९ मिमी पावसाची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...