आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Monsoon | This Year, The Monsoon Will Be Active For 71 Days Instead Of 48, But Will Return From New Places

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद मान्सून:यंदा 48 ऐवजी 71 दिवस मान्सून सक्रिय राहणार, मात्र परतेल नव्या स्थानांहून

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 जुलै ते 17 सप्टेंबरपर्यंत येतील पाऊसधारा, देशात मान्सून कॅलेंडरचे हेच नवे नॉर्मल ठरणार

(अनिरुद्ध शर्मा)

देशात मान्सून सक्रिय राहण्याचा कालावधी आता ४८ दिवसांऐवजी ७१ दिवसांचा असणार आहे. देशात मान्सून कॅलेंडरचे हे नवे नॉर्मल आहे. एक जूननंतर केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि हळूहळू तो देश व्यापेल. १५ जुलै ते १ सप्टेंबरपर्यंत सक्रिय राहणारा मान्सून आता ८ जुलै ते १७ सप्टेंबरपर्यंत देशात एकाच वेळी सक्रिय राहील. हा मान्सून आता १६ दिवस उशिराने परतणे सुरू होईल. यासोबतच मान्सूनचे नवे कॅलेंडर लागू होईल. नव्या कॅलेंडरमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची तारीख १ जून हीच आहे. मात्र, यंदा परतण्याची ठिकाणे बदलली आहेत. आता मान्सून इंफाळ, कलिंगापट्टनम (आंध्र प्रदेश) व गंगावटी (कर्नाटक) येथून परतेल. येथे नैऋत्य मोसमी वाऱ्याचा अखेरचा पाऊस पडेल. दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या नव्या कॅलेंडरमुळे देशभरात जलाशयांतील पाण्याचे नियोजन, नद्या व कालवे, वीजनिर्मिती या व्यवस्थापनात लाभ होईल.

बाडमेरमध्ये २२ दिवस अधिक, इंदूरमध्ये कमी

पुणेस्थित हवामान संशोधन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. पै यांनी सांगितले की, मान्सूनचे आगमन व प्रस्थान या तारखांत बदल केला आहे. यामुळे अनेक शहरांत मान्सूनचा कालावधी वाढला. काही ठिकाणी तो २-५ दिवस कमी झाला आहे. बाडमेरमध्ये आता २२ दिवस अधिक तर अहमदाबाद, इंदूर, अकोला व पुरीमध्ये तो थोडा कमी होईल.

बातम्या आणखी आहेत...