आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Moratorium Case: The Diwali Of The Common People Is In Your Hands, Take Some Concrete Steps; The Supreme Court Sought A Reply From The Center On The Interest Waiver For Small Borrowers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोरॅटोरियम प्रकरण:सर्वसामान्यांची दिवाळी तुमच्याच हाती, काहीतरी ठोस पावले उचला; छोट्या कर्जदारांच्या व्याजमाफीबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून उत्तर मागवले

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्याजमाफी योजनेच्या अंमलबजावणीवर होणाऱ्या विलंबावरून कोर्टाने केंद्राला फटकारले

लोन मोरॅटोरियमच्या अवधीतील व्याजावरील व्याजमाफीसाठी दाखल अनेक याचिकांवर सुप्रीम कोर्टाने पुन्हा सुनावणी घेतली. त्यात व्याजमाफी योजनेच्या अंमलबजावणीवर होणाऱ्या विलंबावरून कोर्टाने केंद्राला फटकारले. केंद्राला आणखी मुदत देण्यास नकार देत कोर्ट म्हणाले, ‘इतका छोटे निर्णय लागू करण्यासाठी अजून एक महिन्याची मुदत कशाला हवी? कृपाकरून सर्वसामान्यांची दुर्दशा पाहा. तुम्ही तर आधीच मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदाची दिवाळी तुमच्या हातात आहे. यासाठी २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जदारांना सरकारच्या सवलतीचा लाभ लवकर मिळायला हवा.’

हा निर्णय कधीपासून लागू होईल :

कोर्टाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना विचारले की, हा निर्णय कधीपासून लागू होईल? बँकांना परिपत्रक कधी जारी कराल? मेहता म्हणाले, या प्रकरणात काही वेळ दिला जावा. त्यावर कोर्टाने योग्य कृती आराखडा सादर करण्यास सांगितले.

बँका मनमानी करत आहेत : याचिकाकर्ता

याचिकाकर्ते म्हणाले, ‘बँकांना या प्रकरणात जारी आदेशांची तमा नाही. त्या मनमानी करत आहेत. यासाठी कोर्टाने अंतरिम आदेश द्यावा. ९ ऑक्टोबरच्या शपथपत्रात मोरॅटोरियम ६ महिन्यांपेक्षा जास्त वाढवता येत नाही, असे आरबीआयने म्हटले होते.’

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser