आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Morbi Bridge Accident Case Reaches Supreme Court, Hearing Will Be Held On November 14

मोरबी पूल दुर्घटना प्रकरण सर्वोच्च न्यायालयात:14 नोव्हेंबरला होणार सुनावणी, न्यायिक आयोग स्थापन करण्यासाठी तातडीने निर्देश द्या; याचिकाकर्त्याची मागणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळून 140 जणांच्या मृत्यूचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात 14 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. देशभरातील जुन्या इमारतींचे सुरक्षेचे मूल्यांकन करण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायिक आयोगाच्या स्थापनेनंतर या घटनेचे सत्य बाहेर येईल, असे असे वकील विशाल तिवारी यांच्या याचिकेत म्हटले आहे. तिवारी यांनी सरन्यायाधीश उदय उमेश ललित यांना या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. सरन्यायाधीशांनी प्रकरणाची सुनावणी 14 नोव्हेंबरला ठेवण्याचे सांगितले.

या याचिकेत देशभरातील हेरिटेज वास्तूंचे सुरक्षेचे मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच इमारतींच्या सुरक्षेसंदर्भातील बाबी पाहण्यासाठी प्रत्येक राज्यात एक विशेष विभाग निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

अपघाताच्या वेळी पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर

मोरबी येथील दुर्घटना घटना घडली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर होते. या अपघातानंतर पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकही घेण्यात आली. याच बैठकीत 2 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी शोक जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ही माहिती दिली. राज्यात राष्ट्रध्वज अर्धवट राहील आणि कोणताही अधिकृत कार्यक्रम होणार नाही.

झुलता पूल कोसळला, पण या मृत्यूचे गुन्हेगार सुरक्षित आहेत

गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील झुलता केबल पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या 134 वर गेली आहे. यामध्ये 50 पेक्षा अधिक मुलांचा समावेश आहे. राजकोटचे भाजप खासदार मोहनभाई कुंडारिया यांचे 12 नातेवाइकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या 191 आहे. मृतांच्या आकडेवारीत वाढ होत असताना इकडे या भीषण दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बड्या धेंडांना वाचवण्याचा खेळही सुरु झाले आहेत. येथे वाचा पुर्ण बातमी

मोरबी दुर्घटनेबद्दल बोलताना मोदी भावूक

भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. या कार्यक्रमात सहभागी व्हावे की नाही, असा प्रश्न माझ्यापुढे होता. पण, तुमच्या प्रेमामुळे, सेवेमुळे आणि कर्तव्य बजावण्याच्या संस्कारामुळे मी तुमच्यासाठी खंबीर मनाने हिंमत एकवटली आणि कार्यक्रमाला आलो, असे मोदी म्हणाले. येथे वाचा पुर्ण बातमी

गुजरातमध्ये पूल तुटण्याचे हे गुन्हेगार

गुजरातमधील मोरबी येथे पादचाऱ्यांसाठी असलेला झुलता पूल रविवारी संध्याकाळी कोसळला. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला केल्यानंतर अवघ्या 5 दिवसांतच तुटला. पुलावर उपस्थित असलेले सुमारे 500 लोक नदीत पडले. त्यापैकी आतापर्यंत 190 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि 30 हून अधिक मुलांचा समावेश आहे. पुलाची केबल-नेट धरून बसलेल्या 200 जणांना वाचवण्यात यश आले. येथे वाचा पुर्ण बातमी

गुजरातेतील पूल कोसळतानाचा VIDEO

गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता केबल सस्पेंशन ब्रिज सुटल्याने सुमारे 400 जण मच्छू नदीत कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 190 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. राजकोटचे भाजप खासदार मोहन कुंडारिया यांच्या कुटुंबातील 12 जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेचा पूल तुटतानाचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला आहे. पुलाच्या केबल्स तुटून क्षणार्धात लोक पाण्यात कोसळल्याचे यात स्पष्टपणे दिसून येत आहे. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...