आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे ४ हजारांवर रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सक्रिय (उपचार घेणारे) रुग्णसंख्या ३५,६०० झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २० राज्यांतील सक्रिय रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. झारखंड, आसाम, महाराष्ट्र आणि हिमाचलमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये रोज १०% पेक्षा वाढ होत आहे. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे देशभरात कोरोनाने रोज होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अजूनही ५ पेक्षा कमीच आहे.
महत्त्वाचा मुद्दा असा की देशात संसर्गाचा दर (टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट) सध्या १.५ % पेक्षा अधिक नाही. हा दर जर ५% वर गेला तर महामारी अनियंत्रित मानली जाते. परंतु केरळमध्ये हा दर १०% झाला आहे. गोव्यातही तो ५% आहे. इतर सर्व राज्यांत संसर्ग दर नियंत्रणात आहे. याच कारणामुळे देशातील केवळ ३% लोकसंख्येच्या केरळमध्ये देशातील ३४% सक्रिय रुग्ण आहेत. केरळसोबत महाराष्ट्राला जोडले तर देशातील ६१% सक्रिय रुग्ण या दोन राज्यांतीलच आहेत. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीला वगळल्यास कोणत्याही राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक नाही. २६ राज्यांमध्ये रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या शून्यावर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.