आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाबरू नका, सतर्क राहा:नवे कोरोना रुग्ण भलेही जास्त, पण मृत्यू नोव्हेंबरपेक्षा निम्म्याहूनही कमी, एका दिवसात 44 हजार कोरोना रुग्ण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सलग ११ व्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांत वाढ झाली. रविवारी ४४,०४२ रुग्ण आढळले. त्यातील एकट्या महाराष्ट्रातील ३०,५३५ रुग्ण आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान जेव्हा रोज आढळणाऱ्या रुग्णांची सरासरी ४४ हजार होती तेव्हा रोज सरासरी ५१४ मृत्यू होत होते. आता पुन्हा ४४ हजार रुग्ण आढळत आहेत, पण रोज होणाऱ्या मृत्यूंची सरासरी १८० च्या खाली आहे. म्हणजे आधीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी मृत्यू होत आहेत. देशात गेल्या ३० दिवसांतच रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १४ हजारांवरून ४४ हजारांवर गेली आहे. म्हणजे तिपटीपेक्षाही जास्त वाढ. रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या १०१ वरून १९७ झाली आहे, म्हणजे दुपटीपेक्षाही कमी वाढ झाली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशातील ८५.१४% नवे रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात व मध्य प्रदेश या ६ राज्यांतील आहेत. देशातील काही शहरे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे जात आहेत. त्यात मुंबई, पुणे, नागपूर प्रमुख आहेत. देशात एकूण संक्रमित १.१५ कोटींवर असून सक्रिय रुग्ण ३ लाखांवर आहेत.

गुजरातमध्ये धुळवडीवर बंदी, राजस्थानच्या ८ शहरांत नाइट कर्फ्यू, बीएमसीचे स्पष्टीकरण- मुंबईत कर्फ्यूही नाही व लॉकडाऊनही नाही
वाढते रुग्ण पाहता काही राज्यांत निर्बंध वाढवले जात आहेत. गुजरातमध्ये सार्वजनिक धुळवडीवर बंदी असेल. फक्त होळी दहन होऊ शकेल. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदूर आणि जबलपूरमध्ये लॉकडाऊन होते. राजस्थान सरकारनेही सोमवारपासून जयपूरसह ८ शहरांत रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू राहील, अशी घोषणा केली. पण सर्वात संक्रमित शहरांत समाविष्ट असलेल्या मुंबईत नाइट कर्फ्यू किंवा लॉकडाऊनची कुठलीही योजना नाही. मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी सांगितले की, मुंबईत नाइट कर्फ्यू किंवा लॉकडाऊनही लागणार नाही. सध्या मुंबईत रोज सरासरी अडीच हजार रुग्ण आढळत आहेत, तर आम्ही रोज ६ हजार रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा तयार केलेल्या आहेत. आता आधीच्या तुलनेत मृत्यू खूप कमी होत आहेत, त्यामुळे कोणतेही नवे निर्बंध लावले जाणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...