आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारने दिली माहिती:सुप्रीम कोर्टात 10 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे 10 वर्षांपासून प्रलंबित

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टात ७१ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी १० हजारांपेक्षा जास्त एक दशकापासून प्रलंबित आहेत. ही माहिती केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, २ ऑगस्टपर्यंत सुप्रीम कोर्टात ७१,४११ केसेस प्रलंबित आहेत. पैकी ५६ हजार दिवाणी, उर्वरित फौजदारी आहेत. ते म्हणाले, १०,४९१ प्रकरणे एक दशकापेक्षा अधिक काळापासून प्रलंबित आहेत. ४२,००० प्रकरणे ५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून प्रलंबित आहेत. ४०,२८,५९१ प्रकरणे देशभरातील उच्च न्यायालयांत २०१६ मध्ये प्रलंबित होती.

‘...तर ५०० वर्षांतही निकाली निघणार नाही’
सुप्रीम कोर्टाचे न्या. संजय किशन कौल यांनी प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, असे सांगितले. ते म्हणाले, प्रत्येक प्रकरणात सुनावणी सुप्रीम कोर्टापर्यंत आल्यास ५०० वर्षांतही प्रकरणांचा निपटारा शक्य होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...