आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगातील १०० हून जास्त देश वेगाने आपल्या लोकांना कोरोना लस देत आहेत. मंगळवारपर्यंत जगातील एकूण ३० कोटींहून जास्त डोस लावण्यात आले आहेत. लसीकरणात तसे श्रीमंत देशांची आघाडी आहे. गरीब देशांसाठी लसीची उपलब्धता हे एक मोठे आव्हान आहे. भारत आपल्या नागरिकांना डोस देण्यात जगात चौथ्या स्थानी आहे. परंतु लोकसंख्येचा विचार करता १०० व्यक्तींच्या सरासरी प्रमाणात भारत खूप पिछाडीवर आहे. एकूण डोस देण्याच्या बाबतीत अमेरिका आघाडी आहे. प्रतिव्यक्ती १०० डोसच्या दृष्टीने इस्रायल अग्रेसर आहे. भारताने दोन कोटींहून जास्त डोस दिले. अमेरिकेने ९ कोटी डोस दिले आहेत. इस्रायलने १०१ डोस प्रति १०० व्यक्ती पार केले आहेत. भारताने आतापर्यंत २ कोटींहून जास्त डोस दिले आहेत. अमेरिकेने ९ कोटी डोससह पहिला क्रमांक मिळवला आहे. चीनने ५ कोटी डोस देत दुसरा क्रमांक गाठला आहे. परंतु चीनच्या आकडेवारीबाबत साशंकता आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार चीनने सविस्तरपणे आकड्यांचा तपशील दिलेला नाही. म्हणूनच कोरोना विषाणू बाधितांप्रमाणेच चीनचे लसीकरणाचे आकडेही संशयास्पद वाटतात. चीनच्या लसीच्या प्रभावाबाबतही प्रश्न उपस्थित होतात.
कोवॅक्स : घाना कोवॅक्सपासून लस मिळवणारा पहिला देश
गरीब व कमकुवत देशांना लस उपलब्ध व्हायला हवी यासाठी कोवॅक्स नावाची आंतरराष्ट्रीय योजना सुरू करण्यात आली. आरोग्य संघटना त्याचे नेतृत्व करत आहे. या याेजनेअंतर्गत घाना हा पहिला देश आहे. गरीब देशांना वर्षअखेरीस २ अब्ज डोस देण्याची योजना आहे.
अभ्यास : ब्राझीलच्या विषाणूवर फायझर व बायोटेकचा प्रभाव
एका अभ्यासानुसार अमेरिकी कंपनी फायझर व चिनी कंपनी सिनोविकची लस ब्राझीलमध्ये आढळून आलेल्या विषाणूच्या नव्या प्रकारावर जास्त प्रभावी आहे. न्यू इंग्लंड जर्नलच्या प्रयोगशाळेत फायझरची लस पी-१ या विषाणूच्या प्रकारावर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा स्ट्रेन सर्वात आधी ब्राझीलमध्ये आढळला. ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेतील स्थितीतदेखील फायझरचा डोस प्रभावी आढळला. ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या लहानसहान संशोधनात चिनी कंपनी सिनोविक बायोटेकचा डोस पी-१ या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला.
यंदा वर्षअखेरीस कमकुवत देशांना लसीचे २ अब्ज डोस देण्याची योजना
कोवॅक्सचे उद्दिष्ट यंदा वर्षारेखीस कमकुवत देशांना लसीचे २ अब्ज डॉस देणे आहे. भारत इतर देशांना लस देण्यात अग्रेसर आहे. आतापर्यंत भारताने ६० हून जास्त देशांना डोस दिले. संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकांना दोन लाख डोस दिले आहेत.
अमेरिकेत लस घेतलेले लोक विनामास्क एकत्र राहू शकतात
अमेरिकेत लस घेतलेले लोक विनामास्क व शारीरिक अंतराचा नियम न पाळताही राहू शकतात. सेंटर फॉर डिजिज कन्ट्रोल अँड प्रिव्हेंशनने नवीन मार्गदर्शक तत्व जारी केले आहे. लोकांनी संपूर्ण डोस घेतला आहे. ते बंद ठिकाणी विनामास्क सोबत राहू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.