आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • More Than 20 Launching Pads Are Ready Across The Border, Ready For 100 Militant Incursions

थंडी वाढताच पाकिस्तानचे कारस्थान:सीमापार 20 पेक्षा अधिक लाँचिंग पॅड तयार, 100 अतिरेकी घुसखोरीसाठी सज्ज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात थंडी आणि बर्फवृष्टी वाढताच ‘नापाक’ पाकिस्तानने कारस्थान रचण्यास सुरुवात केली आहे. गुप्तचर संस्था आयएसआयने “लष्कर’च्या १०० दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी सज्ज ठेवले आहे. काश्मीर सरहद्दीनजीकच्या परिसरात १० पेक्षा अधिक लाँचिंग पॅड तयार केले आहेत. ही संख्या गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर संस्थांना याबाबत काही धक्कादायक माहिती हाती लागली. त्यानंतर सुरक्षा दलांची निगराणी आणखी वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएसआयने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना भारतीय सरहद्दीत घुसखोरी करण्यासाठी कुपवाडा भागानजीक लाँचिंग पॅड तयार केले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये कुपवाडा परिसरात दोन वेळा सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली. यात एक दहशतवादी मारला गेला तर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून ही माहिती मिळाली. कडाक्याच्या थंडीत तग धरून ठेवण्याच्या दृष्टीने दहशतवाद्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. थंडी पडताच पाकिस्तानी सैनिक गोळीबार करून अतिरेक्यांना घुसखोरीसाठी मदत करतील.

दहशतवाद्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी सैन्याची तुकडी “लष्कर’च्या दहशवाद्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी लष्कराची एक पूर्ण तुकडीच तैनात करण्यात आली आहे. ही तुकडी त्यांना इतर साहित्यही उपलब्ध करून देत आहे. या कटाचा एक भाग म्हणूनच दहशतवाद्यांनी कुपवाडा भागात घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलांनी तो उधळला.

बातम्या आणखी आहेत...