आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • More Than 2,000 Bodies Were Found In An Area Of 1,140 Km On The Banks Of The Ganges

उत्तर प्रदेश:गंगा किनाऱ्यावर 1,140 किमी भागात आढळले 2 हजारांपेक्षा जास्त मृतदेह

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेशातील 27 जिल्हे कानपूर, उन्नावची परिस्थिती खूप खराब, अन्य जिल्हे नियंत्रणात

मी गंगा अाहे. आपल्यापैकी बरेच जण मला गंगामाता म्हणतात. काही भागीरथी तर काही जान्हवी, मंदाकिनी अाणि अलकनंदासारख्या नावाने हाक मारतात. माझ्या मायेचा पदर हिमालयातील गंगाेत्रीपासून ते गंगासागरपर्यंत पसरलेला अाहे. गेल्या अनेक दशकांपासून तुम्ही माझी पूजा करत अाहात. तुमच्या सर्वांची ही अास्था माझ्यामध्ये एक अाई अाणि बालक यातील एक अतूट नाते दर्शवते. या प्रेम आणि विश्वासाने मी नेहमी तुमचीच बनून राहिले. अगदी तुम्ही माझ्या पदरात नारळ अाणि सडलेली फुले फेकून देत पाणी खराब केले. यामुळे मला थाेडा त्रास झाला. पण जितका अाज हाेत अाहे तितका नाही. माया अाणि प्रेमासाठी मी माझा पदर नेहमीच पसरला, पण अाज ताे मृतदेहंानी भरला अाहे. डाेळ्यातून अश्रू वाहत अाहेत... इतक्या वेदना.. हे भाेलेनाथा, मला पुन्हा जटांमध्ये सामावून घे. माझ्या मुलांची ही दुरवस्था बघून मन विषण्ण झाले अाहे.

उत्तर प्रदेशातल्या २७ जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या गंगेच्या जलधारा कदाचित हेच दु:ख व्यक्त करत अाहे. फक्त त्यांची पद्धत काहीशी वेगळी अाहे. म्हणूनच ज्यांनी मृतदेह दफन करून सत्य परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला ते गंगामातेने स्वत:च बाहेर काढले. ‘दैनिक भास्कर’च्या ३० वार्ताहरांनी बिजनाैर, मेरळ, मुजफ्फरनगर, हरदाेई, फर्रुखाबाद, कन्नाैज, कानपूर, उन्नाव, प्रयाेगराज, प्रतापगड, भदाेही, मिर्झापूर, वाराणसी, गाझीपूर अाणि बलियामध्ये गंगा किनाऱ्याचा घाट अाणि गावांचा अाढावा घेतला. गंगा नदी यूपीच्या याच जिल्ह्यांतून १,१४० किलाेमीटरचा प्रवास करून बिहारमध्ये दाखल हाेते. यात कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर व बलियातील परिस्थिती खूप वाईट हाेती. अन्य जिल्ह्यांत परिस्थिती नियंत्रणात दिसली. वाचा हा अाढावा..

गाझीपूरमध्ये मृतदेह मिळणे सुरूच, बक्सरमध्ये १०० मिळाले
पूर्वांचलच्या या सर्वात माेठ्या जिल्ह्यात गंगेत मृतदेह सापडणे कायम अाहे. पहिल्या दाेन दिवशीच भास्करने येथे ११० पेक्षा जास्त मृतदेह असल्याचा गाैप्यस्फाेट केला हाेता. ५२ मृतदेहांचा व्हिडिअाेदेखील केला हाेता. पाेलिसांनी सर्व मृतदेह काढून दफन केले. राेज येथे १० ते १२ मृतदेह मिळत अाहेत. बिहारच्या बक्सरमध्येही पहिल्या दाेन दिवशी १०० पेक्षा जास्त मृतदेह मिळाले. तेव्हापासून पाेलिसांनी गंगेत जाळी लावली अाहे.

कानपूरमध्ये भयावह स्थिती, मृतदेहांवर माती टाकली

कानपूरमधील शेरेश्चवर घाटापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर अनेक मृतदेह दफन केले अाहेत. भास्करच्या वार्ताहराने स्वत: त्याची पडताळणी केली. स्थिती खूप भयावह हाेती. े नजर टाकावी तिकडे दफन केलेले मृतदेह. काहींचे तर कुत्रे लचके ताेडत हाेते, तर काहींवर गिधाडे- कावळे बसलेले दिसले. माहिती मिळताच पाेलिसांचे पथक पाेहोचले व प्रत्येक मृतदेहावर माती टाकण्याचे काम सुरू केले.

उन्नावमध्ये रेतीत दाेन जागी ९०० पेक्षा जास्त मृतदेह केले दफन

काेराेना काळात सध्याच्या स्थितीत उन्नाव हेच देशातील सर्वात माेठे स्मशान बनले अाहे. येथील शुक्लागंज घाट व बक्सर घाटाजवळ जवळपास ९०० पेक्षा जास्त मृतदेह दफन अाहेत. भास्करने या दाेन्ही जागांची पाहणी केली. पावलाेपावली मानवी अवयव विखुरलेले. कुत्रे मृतदेहाचा हात तर काहींचा पाय अाेढत अाहेत. भास्करच्या गाैप्यस्फाेटानंतर प्रशासनाने घाईघाईत सर्व मृतदेहांवरील कफन हटवून त्यावर रेती टाकली.

कन्नाैजमध्ये ३५० पेक्षा जास्त मृतदेह, लपवले जात अाहेत

कन्नाैजच्या महादेवी गंगाघाटच्या जवळ ३५० पेक्षा जास्त मृतदेह दफन केले अाहेत. काेणी बघू नये म्हणून प्रशासन त्यावर माती टाकत अाहे. घाटावरील कर्मचारी राजनारायण पांडेय म्हणाले, गंगेच्या किनारी दफन केलले मृतदेह जातात ते पाण्याची पातळी वाढल्यावर वर येतात. हेच मृतदेह वाहून दुसऱ्या जिल्ह्यातही जातात. गंगाकिनारी वसलेल्या जिल्ह्यातही हीच परिस्थिती अाहे.

बातम्या आणखी आहेत...