आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या सुट्यांची तयारी...:या आठवड्यात 30% जास्त लोक वीकेंडला पर्यटनासाठी निघतील

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्माएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या आठवड्यात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत ३०% जास्त लोक वीकेंडसाठी घरांतून बाहेर पडणार आहेत. रेड बस या ऑनलाइन बस टिकेटिंग प्लॅटफॉर्मवर दिवाळीच्या आठवड्यासाठी ४२.५० लाख पर्यटकांनी तिकिटे बुक केली आहेत. हे बुकिंग देशातील २.५ हजार बस ऑपरेटर व २१ राज्य परिवहन महामंडळांद्वारे करण्यात आले आहे. त्यात ४२% तिकिटे मेट्रो व राजधानीच्या शहरांतून, तर उर्वरित इतर शहरांतून बुक केली आहेत.

या बुकिंगद्वारे पुढील सात दिवसांच्या आत हे प्रवासी सुमारे ९४ कोटी किलोमीटरचा प्रवास करतील. देशात सर्वाधिक प्रवासी बंगळुरूहून सण व वीकेंड साजरा करण्यासाठी निघतील. यंदा बंगळुरूहून हैदराबाद व चेन्नईसाठी सर्वाधिक तिकिटे बुक करण्यात आली आहेत. त्याशिवाय गोवा-पुणे, नागपूर-पुणे, कोलकाता-दुर्गापूरही सर्वाधिक व्यग्र मार्ग असतील. गेल्या वर्षी दिवाळीच्या आठवड्यात चेन्नईहून मदुराई आणि हैदराबाद ते विजयवाडा मार्गावर सर्वाधिक लोकांनी प्रवास केला होता. दिल्ली-गोरखपूर, विशाखापट्टणम-हैदराबाद मार्गही अव्वल-५ मार्गांत समाविष्ट होते. ‘रेड बस’नुसार, यंदा सर्वात लहान मार्गावर आसाममध्ये गुवाहाटीत इंटरसिटी रूटसाठी ४.९ किलोमीटरच्या (२० मिनिटे) प्रवासासाठी तर सर्वात लांब मार्गाच्या रूपात बंगळुरू ते फलौदीसाठी (राजस्थान) २०८६ किलोमीटरच्या (३७ तास) प्रवासासाठी बुकिंग करण्यात आले आहे.

‘रेड बस’च्या सीईओंनी सांगितले की, देशातील जवळपास सर्व मार्ग कुठल्याही निर्बंधांशिवाय प्रवासासाठी खुले करण्यात आले आहेत. सुमारे दीड वर्षानंतर दिवाळीनिमित्त घराबाहेर पडण्यासाठी सकारात्मक भावना दिसत आहे. ते म्हणाले की, सण आणि वीकेंड येईल तशी इंटरनेट बुकिंगमध्ये वाढीची खूप अपेक्षा आहे. त्याशिवाय शाळा, कॉलेजही उघडत असून कार्यालयांत फिजिकल वर्किंगही सुरू होत आहे.

तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक व गुजरातमधून सर्वाधिक तिकिटे
सर्वाधिक तिकिटे बुक करणाऱ्या देशाच्या अव्वल-५ राज्यांत या वर्षी तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक व गुजरातचा समावेश आहे. तामिळनाडूत चेन्नई ते मदुराई, बंगळुरू व कोइम्बतूर मार्ग, महाराष्ट्रात पुणे ते गोवा, नागपूर व मुंबई, आंध्र प्रदेशात हैदराबादहून विजयवाडा व बंगळुरू, तेलंगणात विशाखापट्टणम ते विजयवाडा, बंगळुरू ते हैदराबाद, चेन्नई व कोइम्बतूर आणि गुजरातमध्ये अहमदाबाद ते राजकोट, सुरत व उदयपूरसाठी सर्वाधिक तिकिटे बुक करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...