आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिरभूम हिंसाचारानंतर पोलिसांनी मागील 24 तासांत पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांत छापेमारी करुन 350 हून अधिक क्रूड बॉम्ब जप्त केलेत. यातील सर्वाधिक 200 बॉम्ब बिरभूमच्या मारग्राम भागात आढळलेत. पोलिसांनी या प्रकरणी 11 संशयितांच्या मुसक्याही आवळल्यात.
हिंसाचार झालेल्या घटनास्थळपासून 40 किमीवर आढळळे 60 बॉम्ब
पोलिसांनी शनिवारी केलेल्या छापेमारीत 4 बादल्यांत लपवण्यात आलेले 200 बॉम्ब जप्त केलेत. मारग्राम हिंसाचार झालेल्या बागटुई गावापासून जवळपास 40 किमी अंतरावर आहे. पोलीस अधीक्षक नागेंद्र त्रिपाठी यांनी क्रूड बॉम्ब जप्त करण्यासाठी आपल्या अधिकार क्षेत्रात सातत्याने छापेमारी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
चला जाणून घेऊया गत 24 तासांत कुठे जप्त करण्यात आले बॉम्ब...
ममतांनी टीकेमुळे दिले छापेमारीचे निर्देश
बिरभूम हिंसाचारानंतर बंगाल सरकारला चौफेर टिकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलीस महासंचालक मनोज मालवीय यांना राज्यातील सर्वच अवैध बॉम्ब व शस्त्र जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी ही छापेमारी केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बॅरकपूर-बीजपूर मंडळातील पोलिस यंत्रणा सर्वाधिक सक्रिय झाल्याचे सांगितले आहे. हे अभियान 10 दिवस चालेल.
राज्यपालांनीही सरकारला धरले धारेवर
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदिप धनखड यांनीही यापूर्वी अनेकदा राज्यात बॉम्ब तयार करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी बिरभूम हिंसाचाराचा एक व्हिडिओ ट्विट करत बंगालमधील कायदा सुव्यवस्था संपुष्टात आल्याचीही टीका केली होती. ममतांनी त्यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
130 रुपयांत मिळतो बॉम्ब
इंडिया टुडेने 2021 च्या आपल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बॉम्ब तयार करण्याच्या एका कारखान्याचा भांडाफोड केला होता. त्यात बंगालमध्ये अवघ्या 130 रुपयांना बॉम्ब मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता.
मंत्री-खासदारांवरही झालेत बॉम्ब हल्ले
बंगालमधील अनेक मंत्री व खासदार बॉम्ब हल्ल्यांतून बालंबाल बचावलेत. 2021 च्या निवडणूक प्रचारावेळी मुर्शिदाबादला गेलेले तत्कालीन मंत्री झाकिर हुसैन एका बॉम्ब हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. काही दिवसांपूर्वी कोलकात्याजवळ भाजप खासदार जगनाथ सरकार यांच्या कारवरही बॉम्ब फेकण्यात आला होता. तेही त्यातून बालंबाल बचावले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.