आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संसर्ग:देशात 110 दिवसांनंतर 39 हजारहून अधिक रुग्ण; 154 लोकांचा मृत्यू, मुंबईत माॅलमध्ये प्रवेशापूर्वी चाचणी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला असून प्रथमच ११० दिवसांनंतर चोवीस तासांत ३९ हजार ७२६ रुग्ण आढळले. १५४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २५ हजार ६८१ नवे रुग्ण आढळले. तर, पंजाबमध्ये २३६९ आणि केरळमध्ये १८९९ नवे रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली असून मुंबईत मॉलमध्ये प्रवेशापूर्वी लोकांना रॅपिड अँटिजन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात खासगी कार्यालयांतही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली जाणार नाही. यात आरोग्य व अत्यावश्यक सेवांना सूट असेल. या राज्यात कोरोना रुग्णांसाठी सध्या १२,७३८ बेड असून त्यातील ६,२३७ शिल्लक आहेत.

पंजाबमध्ये सिनेमागृहांत ५०%हून अधिक प्रेक्षक असणार नाहीत. मॉलमध्ये १०० हून अधिक लोकांना परवानगी नसेल. अंत्यसंस्कार व विवाहात २० लोकांनाच परवानगी आहे. इतर सर्व समारंभांवर बंदी असेल. ११ जिल्ह्यांत रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू आहे.

रेकॉर्डब्रेक ३९ हजार रुग्ण : देशात ११० दिवसांनंतर प्रथमच विक्रमी ३९हून अधिक कोरोना रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत ३९ हजार ७२६ रुग्ण आढळले. तर, १५४ रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी २९ नोव्हेंबर २०२० रोजी ३८ हजार ७७२ रुग्ण आढळले होते. या वर्षी फेब्रुवारीत ८ हजार ६३५ रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या पाच दिवसांत दीड लाखाहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे.

भास्कर ग्राउंड रिपोर्ट : केंद्रीकृत प्रणालीने केरळमध्ये रुग्णांची देखरेख, यामुळे नव्या रुग्णसंख्येत झपाट्याने घट : के. जी. शाजी, तिरुवनंतपुरम
केरळमध्ये गेल्या महिन्यापासून नव्या रुग्णांची संख्या सतत कमी होत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने हे शक्य झाले. राज्य सरकारने जानेवारीत रुग्ण वाढू लागताच चाचण्या वाढवून लक्षणे नसलेल्या रुग्णांचा शोध सुरू केला. त्यामुळे हळूहळू कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला. २४ जानेवारीला ७२,८९१ सक्रिय रुग्ण येथे होते. शुक्रवारी ते २५,१५९ वर आले आहेत. राज्य अँटी कोविड ऑपरेशनचे समन्वयक डॉ. मुहम्मद असील यांच्यानुसार, ज्या रुग्णांत लक्षणे आढळतात त्यांची अगोदर अँटिजन आणि नंतर आरटीपीसीआर चाचणी केली जाते. राज्यात अशा चाचण्यांची क्षमताही वाढवण्यात आली आहे. रोज ३ हजार नमुने घेतले जात आहेत. ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी आणि त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी एक केंद्रीकृत प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे श्वासाचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्मीच राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...