आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • More Than 60 Lakh Corona Doses Were Given In The Country For The Second Day, Vaccinating 2.70 Crore People In The Last 4 Days

कोरोना लसीकरण:देशात सलग दुसऱ्या दिवशी 60 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले, मागील 4 दिवसात 2.70 कोटी लोकांचे लसीकरण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सलग दुसर्‍या दिवशी 60 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत 60.36 लाख लोकांचा लसीकरणाचा डेटा cowin.gov.in वर देण्यात आला. 21 जूनपासून सुरू झालेल्या मेगा लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 4 दिवसांत 2.70 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. 21 जून रोजी विक्रमी 90.86 लाख, 22 जून रोजी 54.22 लाख, 23 जून रोजी 64.83 लाख डोस देण्यात आले.

गुरुवारी उत्तर प्रदेशात सर्वाधिक 8.51 लाख डोस देण्यात आले. यापूर्वी 22 जून रोजी येथे 8 लाखाहून अधिक लोकांना लस देण्यात आली होती. मध्य प्रदेश 7.44 लाख डोस घेऊन दुसर्‍या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशात गेल्या 4 दिवसांत 33 लाखाहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 17 लाख डोस 21 जून रोजी देण्यात आले होते.

याव्यतिरिक्त गुजरात आणि महाराष्ट्रात 4-4 लाखाहून अधिक डोस देण्यात आले आहेत. तीन लाखाहून अधिक डोस देणाऱ्या राज्यात कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. राजधानी दिल्लीत केवळ 1.57 लाख लोकांना लस देण्यात आली.

4 दिवसात ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त लसीकरण
भारताने मागील 4 दिवसात जेवढ्या लोकांचे लसीकरण केले आहे, त्यापेक्षा जास्त लोकसंख्या जगात केवळ 50 देशात आहे. 185 देशांची लोकसंख्या यापेक्षा कमी आहे. भारतने या दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि नॉर्थ कोरियापेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण केले आहे. नॉर्थ कोरियाची लोकसंख्या 2.57 कोटी तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.54 कोटी आहे.

बातम्या आणखी आहेत...