आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Central Hospital Job Update | More Than Forty Thousand Jobs In Central Hospitals; There Have Been No Recruitments For Four Years

केंद्रीय रुग्णालयांत चाळीस हजारांहून अधिक नोकऱ्या:चार वर्षांपासून भरती झाली नाही, एम्समध्ये 27 हजार जागा रिक्त

नवी दिल्ली / पवनकुमार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभर उभारण्यात आलेल्या आपल्या रुग्णालयांसह इतर संस्थांत ४० हजारहून अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या अडीच वर्षांत ही भरती केली जाणार आहे. सध्या २७,५९९ पदे एकट्या एम्समध्ये रिक्त आहेत. अर्थ मंत्रालयानेही या पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. सुमारे चार वर्षांपासून ही पदे भरली गेलेली नाहीत.

वास्तविक, दीर्घकाळ रिक्त राहिलेली पदे अर्थ मंत्रालय रद्द करते. मात्र, यंदा हा निर्णय टाळण्यात आला आहे. अ दर्जाच्या पदांसाठी यूपीएससीला कळवण्यात आले आहे, तर अ दर्जात पदोन्नतीसाठी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीला कळवण्यात आले आहे. याशिवाय कार्मिक व प्रशिक्षण विभागालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...