आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुरैना येथील लेपा गावात 6 जणांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेवेळी पोलिस व आरोपींमध्ये चकमक झाली. पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात आरोपी अजितच्या पायात गोळी लागली. तर आरोपी भूपेंद्रच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी अजित सिंगला उपचारासाठी मुरैनाला पाठवले आहे. मंगळवारी पहाटे 5 च्या सुमारास ही चकमक झाली.
या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी प्रथम 9 आरोपी बनवले होते. त्याता आता एका महिलेचे (रज्जो) नाव जोडण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अजित भूपेंद्रसह एकूण 6 अटक केली आहे. 4 जण अद्याप फरार आहेत.
महुआ पोलिस स्टेशनचे प्रभारी ऋषिकेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित सिंह तोमर व भूपेंद्र तोमर पहाटे 5 च्या सुमारास चंबळ नदीच्या उसैथ घाटावर थांबले होते. यावेळी पोलिस व त्यांच्यात चकमक झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. अजित सिंगकडून 315 बोअरची रायफल, 2 रिकामी व 1 लोडेड काडतुस जप्त करण्यात आले.
हत्याकांडात या लोकांचा सहभाग असल्याचा संशय
या हत्याकांडातील मुख्य आरोपींत अजित सिंहशिवाय स्वतः धीर सिंह तोमर, त्यांची 2 मुले श्याम सिंह व सोनू तोमर आणि सोवरन सिंह तोमर यांची मुले भूपेंद्र सिंह व बलराम सिंह तोमर यांची नावे प्रामुख्याने समाविष्ट असल्याची माहिती आहे. 2013 मध्ये सोवरनची हत्या झाली. याशिवाय इतरही काही लोकांचा सहभाग आहे. त्यापैकी अजित व भूपेंद्रला शॉर्ट एन्काउंटरनंतर अटक करण्यात आली.
शरण येण्यास सांगितल्यानंतर गोळीबार
एसपी शैलेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, मुरैना गोळीबाराच्या घटनेतील मुख्य आरोपीचे ठिकाण महुआ पोलिस स्टेशन हद्दीतील उसैथ घाटाच्या आसपास आहे. ते तेथून नदी ओलांडून शेजारच्या राज्यात जाण्याच्या प्रयत्नांत होते. खबर मिळताच पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी गेले. त्यांना घेराव घालून आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनाही प्रत्युत्तरादाखल गोळीबार करावा लागला.
आरोपींवर 30 हजारांचे बक्षीस
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी धीर सिंह, रज्जो देवी, पुष्पा व सोनू तोमर यांना यापूर्वीच अटक केली आहे. सुरुवातीला सर्व आरोपींवर प्रत्येकी 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ते सोमवारी वाढवून 30 हजार रुपये करण्यात आले. अजितसिंह तोमर व भूपेंद्रसिंह तोमर यांना संक्षिप्त चकमकीनंतर पकडण्यात आले आहे. तर श्यामूचा मुलगा धीरसिंह तोमर, मोनूचा मुलगा धीरसिंह तोमर, रामूचा मुलगा धीरसिंह तोमर व गौरवचा मुलगा सूरजभान सिंह तोमर फरार आहेत.
मुरैनात 6 जणांची गोळ्या घालून करण्यात आली होती हत्या
मुरैना येथील लेपा भिडौसा गावात 5 मे रोजी पहाटे एकाच कुटुंबातील 6 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गावातील 2 कुटुंबांमध्ये गत 10 वर्षांपासून शत्रूत्व होते. त्यापैकी एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर गोळीबार केला. त्यात 3 पुरुष व 3 महिलांचा मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले. काँग्रेस आमदार रवींद्र सिंह हे या गावचे आहेत.
या गोळीबारात खालील व्यक्ती मारले गेले
वाचा, या हत्याकांडाशी संबंधित खालील बातमी...
हत्याकांड:मध्य प्रदेशात एकाच कुटुंबातील 6 जणांची गोळ्या घालून हत्या; दोन्ही गटांत 10 वर्षांपासून सुरू होता वाद, मृतांत 3 महिला
मध्य प्रदेशातील मुरैनाच्या लेपा भिसोडा गावात शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील 6 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, गावातील 2 कुटुंबांमध्ये गत 10 वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातून शुक्रवारी सकाळी एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर गोळीबार केला. त्यात एकाच कुटुंबातील 3 पुरुषांसह 3 महिलांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. काँग्रेस आमदार रवींद्र सिंह यांचे हे गाव आहे.
मुरैना येथील हत्याकांडाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात हल्लेखोर काही जणांना काठीने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहेत. तसेच काही जण बंदुका व लाठ्या घेऊन रस्त्यावर उभे आहेत. त्यापैकी 1 तरुण 5 जणांवर बेछूट गोळीबार करतो, असेही व्हिडिओत दिसून येत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.