आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mosques And Eidgahs Should Be Opened For People, To Offer To Prayers To End Coronavirus: MP Shafiqur Rahman

अजब तर्क:कोरोना हा आजार नसून अल्लाहने आपल्या क्रूरकर्माची दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर... खासदाराचा अजब तर्क

संभल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मशिदींमध्ये केवळ 5 लोकांनी नमाज पठण करून काही होणार नाही - शफीकूर रहमान

देशभरातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण आहे. देशातील रुग्णसंख्या 12 लाखपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण देश एकवटला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या लसीवर शास्त्रज्ञ दिवसरात्र काम करत आहेत. अशातच समाजवादी पक्षाचे खासदार शफीकूर रहमान यांनी कोरोनाच्या समाप्तीसाठी अजब तर्क लावला आहे. कोरोना हा आजार नसून अल्लाहने आपल्या क्रूरकर्माची दिलेली शिक्षा आहे, असे ते म्हणाले. एवढेच नाही तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी सामुहिक नमाज पठण केले पाहिजे, असेही शफीकूर रहमान म्हणाले.

बकरी ईदच्या निमित्ताने जनावरांची बाजारपेठ उघडावी

थोड्याच दिवसांवर बकरी ईद आली आहे. या निमित्ताने मशीद खुले करण्याबाबत शफीकूर पत्रकारांशी बोलत होते. बकरी ईदच्या निमित्ताने जनावरांची बाजारपेठ उघडावी अशी मागणी शफीकूर यांनी यावेळी केली. बकरी ईदच्या निमित्ताने जनावरांची बाजारपेठ सुरु करावी, जेणेकरून मुस्लिम समाजातील लोक बलिदानासाठी जनावरे खरेदी करु शकतील. एवढेच नाही तर मशीद उघडून तेथे लोक कोरोना संपण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करतील असेही ते त्यावेळी म्हणाले.

मशिदींमध्ये केवळ 5 लोकांनी नमाज पठण करून काही होणार नाही

शफीकूर पुढे म्हणाले की, "मशिदींमध्ये केवळ 5 लोकांनी नमाज पठण करून काही होणार नाही. सर्व मुसलमानांनी नमाज पठण केले तरच हा देश वाचू शकतो. ईदच्या दिवशी आम्ही अल्लाहची माफी मागू, तो आपले सर्व गुन्हे माफ करेल आणि आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू मला आशा आहे". दुसरीकडे सरकारच्या वतीने बकरी ईदसाठी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र केवळ 5 लोकांना मशीदीत जाण्याची मुभा असणार आहे. इतरांना घरीच नमाज पठण करण्यास सांगण्यात येणार आहे.