आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण कोरिया आणि चीनसह १५ आशियाई देशांत कोरोनाचे नवे रुग्ण वाढू लागले आहेत. अमेरिकेतही हीच स्थिती आहे.त्यामुळे भारतात चौथी लाट कधी येणार याची गणिते आणि भाकिते मांडली जात आहेत. याबाबत दैनिक दिव्य मराठीने देशातील तीन प्रमुख शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेतील प्रमुख मुद्दे...
डॉ. रमण गंगाखेडकर, माजी शास्त्रज्ञ, आयसीएमआर प्रो. जुगल किशोर, कम्युनिटी मेडिसिन, सफदरजंग, दिल्ली डॉ. नीरज निश्चल, सहप्राध्यापक, एम्स, दिल्ली
कोरोना संसर्गाची चौथी लाट येतेय का? आता चौथ्या लाटेची शक्यता खूपच कमी आहे. कारण भारतात ती रोखण्यासाठी दोन मजबूत अडथळे तयार झाले आहेत. पहिला अडथळा आहे नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती, जी मानवी शरीरात संसर्ग झाल्यानंतर तयार होते. सीरो सर्व्हेनुसार देशाची ९०% लोकसंख्या संसर्गित झाली आहे. म्हणजे त्यांच्यात अँटिबॉडी आहेत. संसर्गानंतर ६ ते १२ महिन्यांपर्यंत दुसऱ्यांदा संसर्गाची शक्यता अत्यंत कमी आहे. दुसरा महत्त्वाचा अडथळा म्हणजे लसीकरण. भारतात १८ वर्षांवरील ९५% लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेलेत. त्यामुळे आम्हाला धोका कमीच आहे.
लसीकरण तर द. कोरियातही झाले, तेथे रोज ४ लाखांवर रुग्ण आढळत आहेत ? दक्षिण कोरिया, चीन, हाँगकाँगमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याचे कारण ओमायक्रॉन व्हेरिएंट आहे, ज्यामुळे भारतात तिसरी लाट आली होती. उल्लेखनीय म्हणजे चीन आणि दक्षिण कोरियात आतापर्यंत बहुतांश लोकांना कोरोना झाला नव्हता, तर भारतात होऊन गेला आहे. यामुळे तेथे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
आपल्यासाठी चिंतेचे कारण नाही का? सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की, कोरोना अद्याप संपलेला नाही. केवळ त्याचा संसर्ग मर्यादित झाला आहे. जगात कोणत्याही ठिकाणी विषाणू असल्यास संपूर्ण जगासाठी तो धोका राहतो. कारण विषाणू सतत म्यूटेट होतो. म्यूटेशन नेहमी रुग्णाच्या शरीरात होते. जोवर विषाणूला संसर्गासाठी नवे शरीर मिळत राहील तोवर म्यूटेशनचा धोका राहील. मात्र, भारतात याची शक्यता सध्या कमी आहे.
जगात एखादा नवा व्हेरिएंट आला तर? तर मग संपूर्ण जगात संसर्गाची नवी लाट येऊ शकते. उदा. आम्ही डेल्टा आणि ओमायक्रॉनमुळे अनुभवले आहे.
जगात सध्या नवा स्ट्रेन ‘बीए.२’ने काेरोना पसरतोय. याचा भारतावर काय परिणाम ? भारतात ओमायक्रॉनने जवळपास सर्व लोकांवर हल्ला चढवला. ‘बीए.२’ स्ट्रेन ओमायक्रॉनचे नवे स्वरूप आहे. भारतात तिसऱ्या लाटेदरम्यान ‘बीए.२’ सापडत गेला. यामुळे भारतात चौथी लाट येऊ शकत नाही.
भारतात नवा कोरोना विषाणूचा व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता आहे का? हो, आहे. त्यासाठी आपणास जीनोम सिक्वेन्सिंग सतत जारी करावे लागेल. याच्या माध्यमातून नव्या व्हेरिएंटचा शोध घेता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.