आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Most Wanted Terrorist Abu Bakr Arrested From UAE After 29 Years, Involved In 1993 Mumbai Blasts | Marathi News

1993 च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेडला अटक:मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सामील दहशतवादी अबू बकरला UAE मध्ये अटक, दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जातो

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू बकर याला UAE मधून अटक करून भारतीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. ही अटक यूएई एजन्सींच्या सहकार्याने करण्यात आली आहे. वृत्तानुसार, अबू बकरला लवकरच भारतात आणले जाईल.

अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जातो. त्याच्या अटकेसाठी बराच काळ ऑपरेशन सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो पाकिस्तान आणि यूएईमध्ये लपून बसल्याची माहिती मिळत होती.

1993 मध्ये मुंबईत 12 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 713 लोक जखमी झाले होते. या मालिकेतील बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

2019 मध्ये अबू बकरला अटक करण्यात आली होती
2019 मध्ये देखील भारतीय एजन्सींनी मुंबई बॉम्बस्फोटाचा दोषी अबू बकर याला UAE मधूनच अटक केली होती. त्यानंतर कागदपत्रांअभावी त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकला नाही, त्यामुळे यूएईच्या अधिकाऱ्यांनी त्याला सोडून दिले. मात्र, पुन्हा एकदा भारतीय यंत्रणांना यश मिळाले असून आता त्याला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे.

अबू बकर पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणे आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देणे यासारख्या कारवायांमध्ये सहभागी आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा दहशतवादी अबू बकर याने मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान मोठ्या प्रमाणात आरडीएक्स भारतात आणल्याचा आरोप आहे.

1997 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती
अब्दुल गफूर शेख आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू बकरचाही तस्करी प्रकरणात सहभाग आहे. तो आखाती देशांतून मुंबईत सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्सची तस्करी करत असे. त्यानंतर 1997 मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतरच भारतीय एजन्सी त्याचा शोध घेत होती.

दाऊदच्या सांगण्यावरून झाले होते स्फोट
12 मार्च 1993 रोजी झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. या दिवशी झालेल्या १२ बॉम्बस्फोटांपैकी पहिला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीबाहेर झाला. त्यावेळी त्या इमारतीत 2000 हून अधिक लोक उपस्थित होते. इमारतीतील लोकांना काही समजण्याच्या आतच ४५ मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. यावेळी स्टॉक एक्स्चेंजपासून फार दूर नसलेल्या एअर इंडिया इमारतीच्या पार्किंगमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर सर्वत्र मृतदेहांचे ढीग साचले होते. यानंतर मुंबईच्या विविध भागात आणखी 10 बॉम्बस्फोट झाले.

हे सर्व बॉम्बस्फोट दाऊद इब्राहिमच्या सूचनेवरून करण्यात आले होते. या स्फोटात सहभागी असलेले सर्व दहशतवादी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित होते. या दहशतवाद्यांमध्ये अबू सालेम आणि फारुख टकला यांसारख्या लोकांचाही समावेश होता, ज्यांना भारतीय तपास यंत्रणांनी पकडले होते. मात्र, या स्फोटाचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम अजूनही बाहेर आहे.

बातम्या आणखी आहेत...