आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mother Left For Malnourished Child At Bus Stop In Bhopal, Women Struggling For Water In Nashik Nanded

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउनमधील भयावः दृष्य:भोपाळमध्ये कुपोषीत बाळाला बस स्टँडवर सोडून पळाली जन्मदाती आई, नाशिक-नांदेडमध्ये पाण्यासाठी महिलांचा संघर्ष सुरुच

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाउनमध्ये कुपोषणाचा शिकार झालेल्या एका चिकमुकल्याचा ह्रदय पिळवटुन टाकणारा फोटो समोर आला आहे. लहान रोपट्याप्रमाणे दिसणारा हा चिमुकला फक्त 10 दिवसांचा आहे, वजन फक्त 1.3 किलोग्राम. भोपाळ पोलिसांना हा चिमुकला होशंगाबाद रोडवर एका कार शो-रूमसमोरील बीआरटीएस बस स्टॉपवर आढळला. पोलिसांनी आसपासच्या परिसरात त्याच्या आईला शोधले, पण तिचा काहीच ठामपत्ता लागला नाही. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता, त्या चिमुकल्याला जेपी रुग्णालयात नेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, तो मुलगा कुपोषीत आहेत. त्याच्या अंगावर जखमेचे निशानदेखील दिसत होते. सध्या त्याला जेपी रुग्णालयातील पीआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पाण्यासाठी शिडीवरुन कोरड्या विहरीत उतरावे लागत आहे

हा फोटो नांदेड जिल्ह्यातील जांभळीतांड्याचा आहे. गावापासून दोन किलोमीटर दूर एक विहीर आहे. या 50 फूट खोल विहिरीत थोडे पाणी आहे. या ठिकाणी लोकांना जीव धोक्यात घालून शिडीच्या साहाय्याने आत जाऊन पाणी काढावे लागत आहे.

भर उन्हात पाण्यासाठी दहा किलोमीटरची पायपीट

हा फोटो नाशिकचा आहे. मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हात कोरोना संक्रमणाची भीती आणि पाण्याची कमतरता. पाण्यासाठी या महिलांना दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

ढगांमुळे उन्हापासून बचाव

ढगांनी व्यापलेला हा फोटो मुंबईचा आहे. देशाला भिजवण्यासाठी मानसुन जवळ येऊन ठेपलाय. 

घरी परतण्यासाठी मजुरांचा संघर्ष

हा फोटो गुजरातच्या सूरतचा आहे. येते लॉकडाउनदरम्यान कर्मभूमिवरुन जन्मभूमीकडे जाण्याची प्रक्रीया सुरुच आहे. चालण्यास असमर्त आईला कडेवर घेऊन जात असलेला एक तरुण.

देशातील पहिल्या जुळ्यांनी कोरोनावर मात केली

हा फोटो गुजरातमधील वडनगरचा आहे. येथे 16 मे रोजी जुळ्यांचा जन्म झाला होता. त्यांची आई कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या जुळ्यांनाही कोरोनाची लागण झाली. पण, आता त्या जुळ्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्या दोघांना शुक्रवारी पहिल्यांदा आईच्या कुशीत देण्यात आले. हे देशातील पहिले जुळे आहेत, ज्यांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना काळात बदलत्या परंपरा

फोटो मध्य प्रदेशातील उज्जैनचा आहे. येथे मंगलनाथ मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी 10 वाजता चिंतामन नगरच्या शिवानी आणि धारचा रहिवासी असलेल्या गोविंदचे लग्न झाले. या लग्नात नियमांप्रमाणे फक्त 10 लोक सामील झाले होते. लग्नात गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसदेखील तैनात होते.

ट्रेन थांबण्यापूर्वीच अन्न-पाण्यासाठी हात पसरणारे मजूर

फोटो मध्य प्रदेशातील बीनाचा आहे. येथे स्थानिक रेल्वे स्टेशनवरुन दररोज अनेक श्रमिक ट्रेन निघत आहेत. या ट्रेन्समध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची स्थिती दयनीय आहे. जेव्हा ट्रेन स्टेशनव येत आहे, तेव्हा ट्रेन थांबण्यापूर्वीच अन्न-पाण्यासाठी मजूर हात पुढे करत आहेत. या रेल्वे स्टेशनवर आयआरसीटीसीकडून अन्न-पाण्याची सोय केली जात आहे.

उन्हापासू काहीकाळ सुटका

फोटो चंडीगडची आहे. शुक्रवारी सकाळी तासभर पाऊस पडला. या पावसामुळे तापमान कमी होऊन 32 डिग्रीवर आले.

नौतपामध्ये पाऊस, मानसूनसारखा त्रास

फोटो हरियाणाच्या सिरसाचा आहे. 25 मे पासून सुरू झालेल्या भीषण उन्हापासून शुक्रवारी पडलेल्या पावसाने काहीकाळ सुटका मिळाली. पावसामुळे शहरभर पाणी भरले होते.

बातम्या आणखी आहेत...