आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मदर्स डे’चे सुखद चित्र:१८ महिन्यांच्या कोरोनाबाधित मुलीसोबत २० दिवस राहिलेली माता ठणठणीत

चंदीगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकाच बेडवर राहूनही आईचा संसर्गापासून बचाव : पीजीआय संशोधन करणार

(मनोज अपरेजा)

कोरोनाबाधित १८ महिन्याच्या मुलीसोबत २० दिवस एकाच बेडवर राहूनही तिच्या आईला कोरोना संसर्ग झाला नाही. चंदीगडमधील पीजीआयमध्ये हे आश्चर्य घडले. इतक्या जवळ राहूनही आई बशी बचावली यावर पीजीआय संशोधन करणार आहे. ही मुलगी २० एप्रिल रोजी कोरोनाबाधित आढळली होती. २० दिवस पीजीआयमध्ये आई तिच्यासोबत राहिली. १७ दिवसांतच मुलीचा रिपोर्ट तीन वेळा पॉझिटिव्ह आला. मात्र, आईचा रिपोर्ट निगेटिव्ह येत राहिला. शनिवारी मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि दोघींनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोविड सेंटरच्या डॉ. रश्मी रंजन गुरू म्हणाल्या, आईची प्रतिकारशक्ती तगडी राहिली. तिने मास्क काढलाच नाही, सतत हातही स्वच्छ ठेवत होती. मुलीस सर्दी नव्हती. त्यामुळे आईला बाधा झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...