आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परिस्थिती कितीही बिकट असो, आई नेहमीच आपल्या मुलांचे संरक्षण करत असते. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुष्टचक्रातही हे पुन्हा सिद्ध झाले. या महामारीच्या काळातही आई मुलांसाठी ढाल बनली आहे. तर, आईचे दूध सुरक्षा कवच ठरले आहे. आई कोरोना पॉझिटिव्ह असूनही तिच्या बाळाला संसर्ग झालेला नाही. कोरोना काळात गुजरातेत सुरतमधील सरकारी रुग्णालयात २४१ कोरोना पॉझिटिव्ह गरोदर मातांची प्रसूती झाली. यापैकी केवळ १३ मातांच्या अर्भकांना कोरोनाची लागण झाली. प्रोटोकॉलनुसार इतर शिशूंची देखील चाचणी झाली. मात्र, कोरोनाची कुठलीही लक्षणे त्यांच्यामध्ये दिसून आली नाही. तसेच आतापर्यंत या शिशूंना कुठलाही त्रास झालेला नाही.
२२८ शिशूंचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह मातांवर उपचार सुरू होता. शिशूंना दूध पाजणेही सुरू होते. मात्र, कुठल्याही बाळाला यामुळे त्रास उद्भवला नाही. काही दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी देखील सोडण्यात आले. कोरोना काळात सिव्हिल आणि स्मीमेर रुग्णालयात एकूण ७ हजार प्रसूती झाल्या आहेत. यातील बहुतांश शिशू निगेटिव्ह आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या कुठल्याही शिशूचा मृत्यू झालेला नाही. स्मीमेर रुग्णालयाचे प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अश्विन वाछानी यांनी सांगितले की, आई कोरोना पॉझिटिव्ह असली तरी तिच्या दुधात एवढी ताकद असते की बाळाला कुठलीही समस्या उद्भवत नाही. याला कोरोना काळातील आकडेवारीमुळेही दुजोरा मिळाला आहे.
आईच्या १०० मिली दुधात असलेले पोषक घटक
- एनर्जी 67 किलो कॅलरी
- प्रोटीन 1.3 ग्रॅम
- फॅट 4.2 ग्रॅम
- कार्बोहायड्रेट 07 ग्रॅम
- सोडियम 15 मिलिग्रॅम
- फास्फरस 15 मिलिग्रॅम
- कॅल्शियम 35 मिलिग्रॅम
- व्हिटामिन-सी 3.8 मिलिग्रॅम
- आर्यन 76 मायक्रोग्रॅम
- व्हिटामिन-ए 60 मायक्रोग्रॅम
- व्हिटामिन-डी 0.01मायक्रोग्रॅम
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.