आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Moti Bazaar With A Turnover Of Rs 100 Crore, Zardozi, The Market For Lakh Bangles Stalled, Only Bridal Dress Sales!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळ देशातील आँखो देखा हाल:100 कोटींची उलाढाल असलेला मोती बाजार, जरदोजी, लाखाच्या बांगड्याची बाजारपेठ ठप्प, केवळ वधूच्या पेहरावाची विक्री!

हैदराबाद (मनीषा भल्ला)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील सर्वात मोठे वेडिंग मार्केट हैदराबादच्या चारमिनार येथून वृत्तांत, दररोज ५ कोटींहून जास्त व्यापार

दागिने, कपडे, मोती, चुडा इत्यादी साज-शंृगारासाठी हैदराबादच्या चारमिनारची जगभरात स्वतंत्र आेळख आहे. रमझाननंतर विवाहाचा हंगाम मानला जातो. येथे पाय ठेवायलाही जागा नसते. एवढी गर्दी असते. ७० हजार ते १ लाख लोक दररोज कोट्यवधींची शॉपिंग करतात. येथील मोत्यांच्या बाजारपेठेत सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होत होती. परंतु आता ही सर्व बाजारपेठ शब्दश: सुनी झाली आहे. स्वत: च्या मनाला दिलासा देण्यासाठी दुकाने उघडून बसतो, असे येथील दुकानदारांचे म्हणणे आहे. दररोज ५ कोटींचा व्यापार करणाऱ्या दुकानांतून ग्राहक गायब आहे. वेडिंग कलेक्शनसाठी प्रसिद्ध काकाजी वेडिंग मॉलचे आरिफ पटेल म्हणाले, हैदराबादचे जरदोजीचे काम असलेला दुपट्टा प्रसिद्ध आहे. त्याची किंमत ११ हजारांपासून पाच लाखांपर्यंत अाहे. परंतु त्यासाठी तूर्त मुळीच ऑर्डर नाही. माझ्याकडे ४० कामगार होते. आता केवळ सात लोक राहिले आहेत. ईद व विवाहाचा हंगाम संपूर्ण वर्षाची कमाई करून देणारा होता. त्यात वधू व्यतिरिक्त नातेवाइकांचे कपडेही विक्रीसाठी असत. परंतु आता घरातच मोजक्या १०-२० वऱ्हाडींच्या हजेरीत लग्न आटोपले जाते. त्यामुळे कुटुंबीय नातेवाइकांसाठी कपडे खरेदी करत नाहीत. ते केवळ वधूचा पेहराव खरेदी करतात.

हैदराबादचा लाड बाजार बांगड्यांसाठी प्रसिद्ध आहे. फिजा बँगलचे जाहिद म्हणाले, सध्या केवळ वधूसाठी शॉपिंग होत आहे. अल-सुल्तान ट्रेडरचे आमिर खान यांच्या म्हणण्यानुसार लाखेवर स्टोनची कारागिरी असलेल्या बांगड्या खूप प्रसिद्ध आहेत. अशी ३०० दुकाने येथे आहेत. एका दुकानात सरासरी दररोज १० ते १२ हजार रुपयांचा व्यवसाय होत होता. आता तेथे मुश्किलीने एक ते दाेन हजारांचा व्यवसाय होतो. चारमिनारच्या बँगल असोसिएशनचे सचिव शोएब म्हणाले, चारमिनार मार्केटमधील सर्व दुकाने एका दिवसात सुमारे पाच कोटी रुपयांचा व्यवसाय करत असत. परंतु कोरोनामुळे हा व्यवसाय दीड कोटीच्या आसपास आहे. त्यासोबतच लहान दुकानदारांनी आपला कर्मचारी वर्ग निम्म्यावर आणला आहे.

मोत्यांबद्दल बोलायचे झाल्यास सराफा असोसिएशनचे हृदय अग्रवाल म्हणाले, जगात मोती कोठेही असले तरी कच्च्या रूपातील मोती हैदराबादेत येतात. येथे गुणवत्तेनुसार मोत्यांचे वर्गीकरण केले जाते. त्यानंतर इतर देशांत पाठवले जाते. मोती व्यावसायिक कुंजबिहार अग्रवाल म्हणाले, मोत्यांचा व्यवसाय पर्यटनावर अवलंबून असतो. परंतु गेल्या पाच महिन्यात आमचा व्यवसाय ठप्प आहे. ३६५ दिवस सदैव गजबजणाऱ्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १०० कोटींच्या घरात होती. परंतु आता ती शून्यावर आली आहे. आम्ही इतर व्यवसाय आता करू शकत नाहीत. कारण आम्हाला मोत्यांशिवाय इतर कोणताही व्यवसाय येत नाही, अशी व्यथा अग्रवाल यांनी सांगितली. वास्तविक मोत्यांचा व्यवसाय चांगला आहे. त्यातून वार्षिक नफा मिळतो. आता व्यवसायावरील संकट दूर करण्यासाठी ई-कॉमर्स संकेतस्थळावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मोती थेट घरापर्यंत पाेहोचवता येणार आहेत. सध्या आम्ही अॅमेझॉन व फ्लिपकार्टच्या माध्यमातून काम सुरू करणार आहोत. ी आपली ई-कॉमर्स वेबसाइट सुरू करू.

बातम्या आणखी आहेत...