आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Motivational Stories : Coronovirus Madhya Pradesh Jabalpur Lockdown Updates On MP Police Officer Anand Pandey

लॉकडाउनमध्ये 2 प्रेरणादायी कथा:जबलपूरमध्ये 450 किमी चालत कॉन्स्टेबल ड्युटीवर पोहोचला, विशाखापट्टणममध्ये मनपा आयुक्त एक महिन्याच्या मुलासोबत कामावर रूजू

विशाखापट्टनम/जबलपूर 3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाला हरवण्यासाठी केंद्र व राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पोलिस कर्मचारीही पूर्णपणे कर्तव्य बजावत आहेत

कोरोनाला हरवण्यासाठी केंद्र व राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पोलिस कर्मचारीही पूर्णपणे कर्तव्य बजावत आहेत. संकटाच्या वेळी आंधप्रदेशातील विशाखापट्टणममध्ये मनपा आयुक्त एक महिन्याच्या मुलाला घरी सोडून आपले कर्तव्य बजावत आहे. कधी-कधी त्या मुलाला घेऊन कार्यालयात काम करतात. दुसरीकडे मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये लॉकडाउन दरम्यान ड्युटीवर पोहोचण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याने कानपूर ते जबलपूरपर्यंत 450 किलोमीटर पायी प्रवास केला. 

आंध्रप्रदेश : विशाखापट्टणम महानगरपालिकेच्या आयुक्त सृजना यांनी एक महिन्यापूर्वी मुलाला जन्म दिला होता. या दरम्यान कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला. अशा परिस्थितीत विशाखापट्टणम सारख्या मोठ्या शहरात आयुक्तांची किती गरज असते हे सांगायची आवश्यकता नाही. सृजना यांनी आपली जबाबदारी लक्षात घेऊन आपले कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला. त्या आपल्या मुलाला पती आणि आईजवळ सोडून दररोज कार्यालयात हजेरी लावत आहेत. आयुक्त स्वच्छतेच्या कामावर देखरेख देखील ठेवत आहेत. एवढेच नव्हे तर प्रसूतीपूर्वी काही दिवसांपूर्वीच त्या ड्युटीवर होत्या. 

कोरोनाविरूद्धच्या लढ्यात माझे योगदान देखील महत्त्वाचे 

सृजना यांनी भास्करशी बोलताना सांगितले की, नवजात मुलाला आईची गरज असते, परंतु मी वैयक्तिक गरजा वेगळ्या ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा आदेश आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा संकटाच्या वेळी माझे देखील योगदान असावे यासाठी स्वच्छतेसह आम्ही लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे काम करीत आहोत.


मध्यप्रदेश  : ड्युटी जॉइन करण्यासाठी कॉन्स्टेबलने 450 किमीचा प्रवास के
ला 

उत्तरप्रदेशच्या कानपुर येथील रहिवासी आनंद पांडे मध्यप्रदेश पोलिसांत शिपाई आहेत. आजकाल तो जबलपूर शहरातील ओमती पोलिस ठाण्यात तैनात आहे. ते 20 फेब्रुवारी रोजी पत्नीच्या उपचारासाठी सु्ट्टी घेऊन गावी आले होते, यादरम्यान लॉकडाउन लागू झाला. यादरम्यान त्यांची सुट्टी संपली, आनंद यांना ड्युटीवर जाण्यासाठी जबलपुरला जायचे होते. अशात त्यांनी हार न मानता 30 मार्च रोजी कानपुरहून जबलपुरसाठी पायी प्रवास सुरू केला. रस्त्यात जिथे जिथे लिफ्ट भेटली, तिथे बसायचे आणि मग पुन्हा उतरून पायी प्रवास करायचे. त्यांना जबलपुरला पोहोचण्यासाठी 3 दिवस लागले. एसपी एस. बघेल यांच्यासह कर्मचार्‍यांनी आनंदच्या हिमतीचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...