आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:फरार विजय मल्ल्यास लंडनहून मुंबईत आणण्याच्या हालचाली, सीबीआय पथक मल्ल्यासह आजच दाखल होणार?

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 बँकांचे 9 हजार कोटींहून अधिक कर्ज बुडवल्याप्रकरणी मल्ल्यावर मुंबईत गुन्हे

आर्थिक घोटाळ्यातील आरोपी विजय मल्ल्या याला लंडनहून मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. कदाचित बुधवारी रात्रीच सीबीआय आणि ईडी त्याला घेऊन मुंबई विमानतळावर दाखल होतील, असे मानले जाते. परंतु, याला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळू शकला नाही.

14 बँकांचे 9 हजार कोटींहून अधिक कर्ज बुडवल्याप्रकरणी मल्ल्यावर मुंबईत गुन्हे दाखल आहेत. रात्री मल्ल्या विमानतळावर आलाच तर त्याला सीबीआय कार्यालयात ठेवले जाऊ शकते. गुरुवारी मल्ल्या यास कोर्टात हजर केले जाईल. दिवसा तो पाेहोचला तर त्याला थेट काेर्टात सादर करून कोठडीची मागणी केली जाईल.

इकडे तुरुंगात तयारी

ब्रिटनमधील एका न्यायालयाने मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाबाबत सुनावणी करताना ऑगस्ट २०१८ मध्ये भारतीय तपास संस्थांना तुरुंगांच्या स्थितीबाबत माहिती मागितली होती. तेव्हा आर्थर रोड तुरुंगातील एका कोठडीचा व्हिडिओ सादर केला होता.

बातम्या आणखी आहेत...