आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • MP Asked, Where Is The Prime Minister And Modi Revealed !; The Case Of The Last Day Of The Budget Session News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पीय अधिवेशन:खासदाराने विचारले, पंतप्रधान कुठे आहेत अन् मोदी प्रकटले!; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचा किस्सा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर झाली, पण पेट्रोल-डिझेल दरवाढ व गॅसच्या महागाईवर कुठलीही चर्चा झाली नाही- खा. बिट्टू

संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी लोकसभेत एक आगळा किस्सा घडला. सभागृहाच्या कामकाजादरम्यान काँग्रेसचे सदस्य रवनीतसिंह बिट्टू यांनी पंतप्रधान मोदी यांच्या गैरहजेरीबाबत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, पंतप्रधान प्रचारसभांत व्यग्र आहेत व सभागृहात येत नाहीत. पंतप्रधानांना शोधण्यासाठी बंगालला जावे का? तेवढ्यात मोदी मागच्या बाजूने दाखल झाले. त्यानंतर सभागृहात जोरदार हशा उसळला. भाजपचे सदस्य उत्साहात ‘भारतमाता की जय’ च्या घोषणा देऊ लागले.

अशी घडली घटना
खा. बिट्टू म्हणाले,‘अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर झाली, पण पेट्रोल-डिझेल दरवाढ व गॅसच्या महागाईवर कुठलीही चर्चा झाली नाही. आम्ही पंतप्रधानांना कुठे जाऊन भेटावे? बंगालच्या सभेत जाऊन भेट घ्यावी का?’ त्यावर भाजपचे अर्जुन राम मेघवाल म्हणाले, हे चूक आहे. हा वाद सुरू होता तेव्हा अचानक पंतप्रधान मोदी सभागृहात दाखल झाले. ते येताच भाजपच्या सदस्यांत उत्साह निर्माण झाला आणि त्यांनी जोराजोरात ‘जय श्रीराम’ आणि ‘भारतमाता की जय’ च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...