आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसींचे पूर्वज हिंदू होते VIDEO:खासदार ब्रिजभूषण म्हणाले - एआयएमआयएम अध्यक्षांच्या वडिलांचे नाव तुलसीराम दास होते, रिझवान आणि मसूद हेही हिंदू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कुस्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ओवेसींवर निशाणा साधला. त्यांनी ओवेसींचे पूर्वज हिंदू असल्याचा दावा केला आहे. असासुद्दीन ओवेसी यांचे वडील हिंदू असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला हवे असल्यास यासंदर्भात संशोधन करुन तुम्ही माहिती मिळवू शकता, असे ते म्हणाले. गोंडा येथे तीन दिवसीय राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ते बोलत होते.

खासदार ब्रिजभूषण पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, "मी हमी देऊ शकतो की ओवेसीचे वडील हिंदू होते. त्यांचे नाव तुलसी राम दास होते.

म्हणाले - आझम खानबद्दल माहिती नाही

ओवेसी यांचे पूर्वज हिंदू असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आझम खान यांचे नावही घेतले. ते म्हणाले, "मला आझम खानबद्दल जास्त माहिती नाही, त्यामुळे मी बोलू शकत नाही. पण, मला रिझवान खानबद्दल माहिती आहे. ते हिंदू होते, मसूद खानबद्दल माहिती आहे, ते ठाकूर होते.

अतिकवर भाष्य

भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी मुस्लिम नेत्यांबद्दल वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही माफिया अतीक अहमद आणि मुख्तार अन्सारी यांच्या कुटुंबाबाबत मोठे विधान केले होते. ते म्हणाले होते की, मुख्तार अन्सारी आणि अतीक अहमद हेही जुने हिंदू आहेत. त्यावेळी परिस्थिती अशी होती की ते मुस्लिम झाला. त्यांना पुन्हा हिंदू बनवता यावे म्हणून आम्ही त्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहोत.

राज ठाकरेंना दिली होती धमकी

यापूर्वी बृजभूषण सिंह हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवल्यानंतर चर्चेत आले होते. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. अयोध्या दौऱ्यापूर्वी 2008-09 मध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेबद्दल राज ठाकरे यांनी माफी मागावी. त्यांना उत्तर भारतीयांची माफी मागायची नसेल तर साधू समाजाची किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी. उत्तर भारतीयांची माफी न मागता राज ठाकरे अयोध्येत आले तर त्यांना 'आईच्या दुधाची' आठवण करून दिली जाईल, अशी धमकीही भाजप खासदार सिंह यांनी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...