आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मध्यप्रदेशातील भोपाळ आणि इंदुरमध्ये पुन्हा कोरोना पसरण्यास सुरुवात जाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री मास्क लावण्याची अपील करत आहेत, पण अनेक मंत्री-आमदार याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मंगळवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक आमदार आणि मंत्री विना मास्क आल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री उषा ठाकुरदेखील मास्क न घालता विधानसभेत दाखल झाल्या होत्या. याबाबत विचारल्यावर त्या म्हणाल्या की, 'मी हनुमान चालीसेचे पठण करते, दररोज शंख वाजवते, काढा पिते, शेणाच्या गवऱ्याचा हवन करते, यामुळे माझी रोग प्रतिकारक शक्ती चांगली झाली आहे. मला कोरोना होणार नाही.'
त्या पुढे म्हणाल्या की, वेदांना 10 हजार वर्षे झाली आहेत. जगात ज्याला चांगल्या पद्धतीचे जीवन जगायचे आहे, त्याने वैदिक पद्धती अवलंबावी. त्या व्यक्तीला कोणताच त्रास होणार नाही. दुसरीकडे, आमदार रामबाई म्हणाल्या, 'मास्क लावल्यावर मला घाबरल्यासारखे होते. मास्क न लावण्याचा जो दंड आहे, तो देईन. पण, मास्क लावणार नाही.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.