आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मध्यप्रदेशात लॉकडाउन 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्यात 13 जूननंतर शाळा-महाविद्यालये उघडण्यात येतील. आतापर्यंत, शाळा-महाविद्यालय सुरू होणार असल्याचे निश्चित आहे, परंतु अंतिम निर्णय काही दिवसांनंतर घेण्यात येईल. कोरोनाचा धोका असल्याने आम्ही 15 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवणार आहोत.
राज्यात संक्रमितांची संख्या 7645 वर पोहोचली असताना मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशात मागील 24 तासांत कोरोना संक्रमणाची 192 नवीन प्रकरणे सापडली आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4269 लोक बरे झाले आहेत.
कमलनाथ यांचे ट्विटः दारूची दुकाने उघडली तर धार्मिक स्थळे देखील उघडा
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 1 जूनपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची सरकारकडे मागणी केली आहे. कमलनाथ यांनी ट्वीट केले आहे की मध्य प्रदेश सरकारने कर्नाटक आणि पश्चिम बंगालप्रमाणे 1 जूनपासून राज्यात सर्व धर्मांची धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घ्यावा. आवश्यक मापदंडांचे अनुसरण करून हा निर्णय घ्यावा असेही कमलनाथ यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडली जाऊ शकतात, तर सर्वसामान्यांच्या श्रद्धेची धार्मिक स्थळे अजूनही बंद का आहेत? असा सवाल देखील कमलनाथ यांनी केला आहे.
मध्यप्रदेश सरकार भी कर्नाटक और प.बंगाल की तरह 1 जून से प्रदेश में सभी धर्मों के धार्मिक स्थल खोलने का निर्णय ले।
— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) May 30, 2020
आवश्यक मापदंडो का पालन सुनिश्चित करवाकर यह निर्णय लेकर इसे अमल में लाया जावे।
1/2
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.