आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण:हिंदीत अभियांत्रिकी शिक्षणात एमपी पुढे; राजस्थानातून केवळ एक अर्ज

पूजा शर्मा | जयपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकीचे शिक्षण प्रादेशिक भाषांत घेण्याच्या घोषणेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. जुलै २०२१ मध्ये नवीन शैक्षणिक धोरणास एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, आठ राज्यांतील १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांत हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी, बंगालीत अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाईल. तेव्हापासून आतापर्यंत एआयसीटीईने देशभरातील ३९ महाविद्यालयांना प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यास मंजुरी दिली आहे. हिंदीसाठी सर्वाधिक ५ राज्यांनी अर्ज केला. १२ संस्थांचे अर्ज मध्य प्रदेशातून आले. राजस्थानच्या एका संस्थेने एक अर्ज केला आहे. तामिळनाडूत तामिळमध्ये शिकण्यासाठी १० संस्थांनी अर्ज केला आहे.

सीएस-मेकॅनिकल इंजी.मध्ये जास्त : २०२१ साठी प्रादेशिक भाषांत कोर्स ऑफर करणाऱ्या संस्थांची संख्या १९ होती. आता ती ३९ झाली आहे. २०२१-२२ साठी ४२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. सर्वाधिक प्रवेश मेकॅनिकल व कॉम्प्युटर सायन्समध्ये झाले.

बातम्या आणखी आहेत...