आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MP Government | Shivraj Singh Chouhan Madhya Pradesh Government Made An Important Decision On Government Job In State

मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय:फक्त स्थानिकांनाच मिळणार सरकारी नोकऱ्या, लवकरच नवीन कायदा आणला जाईल- शिवराज सिंह चौहान

भोपाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली की, यापुढे राज्यात फक्त स्थानिकांनाच नोकऱ्या दिल्या जातील. यासाठी नवीकर कायदेशीर पाऊल उचलले जाईल. शिवराज यांनी एका व्हिडिओद्वारे याची माहिती दिली.

आतापर्यंत मध्य प्रदेशातील सरकारी नोकऱ्यांसाठी संपूर्ण देशातून अर्ज मागवले जायचे. या प्रक्रीयेत देशातील कोणत्याही नागरिकाला अर्ज करता येत होता. यावरुन राज्यातील तरुणांनी खूप विरोध केला होता. हा विरोध पाहता आणि फक्त स्थानिक तरुणांनाच नोकऱ्या मिळाव्यात यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

भाजपचे येणाऱ्या पोट निवडणुकीवर लक्ष

राज्यात 27 विधानसभेच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान आधीपासूनच इतर राज्यातील लोक, जे मध्यप्रदेशात राहतात, त्यांच्यासाठी कोणते नियम असतील, याची माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच, हा नवीन नियम कधीपासून लागू होईल, हेदेखील येणाऱ्या काळात कळेल. या नवीन निर्णयासाठी नवीन कायदा आणला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत एमपीपीएससी आणि इतर नोकऱ्यांसाठी देशभरातून अर्ज येत होते, सर्वांना बरोबरीची भागीदारी मिळायची. परंतू, आता नवीन नियम आल्यानंतर फक्त राज्यातील तरुणांना सरकारी नोकरी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...