आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MP Man Carries Mother's Dead Body On Bike Video | Shahdol Medical College Negligence

मन हेलावून टाकणारी घटना:रुग्णवाहिका न मिळाल्याने आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून 80KM नेला

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहडोलमध्ये ह्रदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वाहन न मिळाल्याने दोन भावांनी आपल्या आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून घरी नेला. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुलांनी गंभीर आरोप केले. जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी आईची योग्य काळजी घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले. मृत्यूनंतर वाहन शोधण्यात आले, मात्र ते मिळाले नाही. मी खाजगी वाहनांशी बोललो, तेव्हा त्यांनी 5000 रुपये मागितले. पण, आमच्याकडे इतके पैसे नव्हते, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे 100 रुपयांचा स्लॅब विकत घेतला आणि मृतदेह बांधून दुचाकीवरून गावाकडे नेला. इकडे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्हिडिओ ट्विट करून शिवराज सरकारवर निशाणा साधला आहे. शहडोल मेडिकल कॉलेजचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन्ही भावांनी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला. यानंतर दुचाकीला लाकडी स्लॅब लावून आईचा मृतदेह बांधला. एका भावाने दुचाकी चालवली आणि दुसऱ्याने मागे बसून मृतदेह धरला. कसेबसे दोघेही शहडोलपासून 80 किमी अंतरावर असलेल्या अनुपपूर जिल्ह्यातील गोदारू गावात पोहोचले.

उपचारात निष्काळजीपणा
सुंदर यादव म्हणाले की, छातीत दुखू लागल्याने आई जयमंत्री यादव यांना शहडोल जिल्हा रुग्णालयात नेले होते. परिचारिकांनी एक इंजेक्शन आणि बाटली दिली, त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. शनिवारी रात्री 11 वाजता जयमंत्री यांना वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. दुपारी 2.40 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयाजवळ एकही वाहन नाही
रुग्णालयाचे अधीक्षक नागेंद्र सिंह म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णवाहिकेची सोय नाही आणि वाहनही नाही. दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या असून, त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. नोंदणी केल्यानंतरच रुग्णांना ही सुविधा दिली जाणार आहे.

मेडिकल कॉलेजचे डीन मिलिंद शिराळकर यांनी सांगितले की, वॉर्ड बॉयने मृतदेह नेण्यासाठी वाहन व्यवस्थेबाबत मृताच्या नातेवाईकांना विचारणा केली होती. नातेवाइकांनी रुग्णालय कर्मचारी व व्यवस्थापनाकडे वाहनाची मागणी केली नाही. मागणी केली असती तर तर नक्कीच सर्वतोपरी सहकार्य केले असते.

बातम्या आणखी आहेत...