आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MP Morena Firecracker Warehouse Blast Updates, Entire Building Collapsed, Many Trapped Under Debris, Rescue Operation Underway

मध्य प्रदेशात अवैध फटाका गोदामात स्फोट:3 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर; स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य

भोपाळ8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशच्या मुरैना येथील फटाक्यांच्या अवैध गोदामात झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की, ज्या इमारतीत फटाके बनवले जात होते ती इमारत पूर्णपणे कोसळली. फटाके बनवणारे अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बनमोर शहराजवळील जैतपूर गावात ही दुर्घटना घडली.

गंभीर जखमींना मुरैना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी इमारतीमध्ये स्फोट झाला, त्यावेळी बांधकामाचे काम सुरू होते. अचानक झालेल्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झाले आणि 7 जण गंभीर भाजले. माहितीवरून एसडीओपी आणि टीआय वीरेश कुशवाह हे टीमसोबत घटनास्थळी गेले आहेत.

2015 पेटलावाड बॉम्बस्फोटात 73 जणांचा झाला होता मृत्यू

झाबुआ जिल्ह्यातील पेटलावाड येथे 12 सप्टेंबर 2015 रोजी स्फोट झाला होता. यात 73 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सकाळी 8.15 वाजता राजेंद्र कांसवा यांच्या गोदामात ठेवलेल्या जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाला. त्यात 70 हून अधिक जण जखमी झाले होते. स्फोट इतका भीषण होता की स्फोटाचा आवाज 11 किमी दूरपर्यंत ऐकू आला. या स्फोटात तीन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर 7 गावांतील लोक बाधित झाले होते.

येथे पाहा दुर्घटनेशी संबंधित फोटोज...