आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अजब दावा:देशातला कोरोना संपवण्यासाठी रोज संध्याकाळी 7 वाजता 5 वेळा हनुमान चालिसाचा जप करा : साध्वी प्रज्ञा

भोपाळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. कोरोनावर केलेल्या वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी हनुमान चालिसाचे वाचन करा असा अजब दावा साध्वी यांनी केला आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर ट्विटरवर म्हणाल्या की, "कोरोनाला संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक अध्यात्मिक प्रयत्न करुयात. 25 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान सायंकाळी 7 वाजता हनुमान चालिसाचे 5 वेळेस वाचन करा." साध्वी यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेक नेटिझन्स साध्वी यांना ट्रोलही करत आहेत.

भोपाळमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात आहेतच, मात्र कोरोनाच्या या संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी आता आध्यात्मिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वक्तव्य साध्वी यांनी केले.

0