आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • MP Sambhaji Raje Met Sharad Pawar And Demanded To Mediate In Kelly Maratha Reservation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:खासदार संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, केली मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करण्याची मागणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संभाजी राजेंनी महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनाही याविषयी पत्र पाठवले.

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. दरम्यान मराठा समाजाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. मराठा आरक्षण लागू करण्यात यावी अशी मराठा बांधवांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर आता खासदार छत्रपती संभाजीराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तसेच मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिली. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाण साधत आहे. खासदार संभाजीराजेंनी स्वत: शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी अशी विनंती संभाजीराजेंनी केली आहे. संभाजीराजे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पवारांकडे एक महत्त्वाची विनंती केली आहे. मराठा बांधवांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी शरद पवारांकडे ही मागणी केली असल्याची माहिती टीव्ही नाइनने दिली आहे.

दरम्यान संभाजी राजेंनी महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनाही याविषयी पत्र पाठवले होते. त्यांनी ते सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये लिहिण्यात आले होते की, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.' असे म्हटले होते.