आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछायाचित्र झाबुआ आणि अलिराजपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या कष्टाचे प्रदर्शन घडवत आहे. त्यांनी स्वबळावर हाथीपावाच्या डोंगरावर समृद्धीची रेषा आखली आहे. हलमा परंपरेअंतर्गत आदिवासींनी श्रमदान करून १४ वर्षांत या डोंगरावर १.६० लाख समतल चर खोदले आहेत. अशा पद्धतीने दोन्ही जिल्ह्यांत साडेचार हजारांपेक्षा जास्त जल संरचनांची निर्मिती केली आहे. यामुळे येथील भूजलपातळी वाढली आहे. डोंगरावर झाडांची संख्या वाढली आहे. या वर्षीही शिवगंगा संस्था हलमा कार्यक्रम २५ व २६ फेब्रुवारीला आयोजित करेल. त्यासाठी राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले आहे. पहिला कार्यक्रम २००९ मध्ये झाला होता. तेव्हापासून आतापर्यंतचा हा ९ वा हलमा असेल. हजारो आदिवासी एकत्र येऊन येथे श्रमदान करून पाणी अडवण्यासाठी चारी बनवल्या. जलसंधारण अन् पाणीपातळीत स्वावलंबी होण्यासाठी आदिवासी नि:स्वार्थ हेतूने येथे येतात.
हे आहे हलमा | आदिवासी परंपरेनुसार आदिवासी गरज पडल्यास दुसऱ्याच्या मदतीला धावतात. घर बांधकाम, लग्नाच्या कामातही कदत करतात. कुणाला काही गरज भासल्यास अशीच पद्धत अवलंबली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.