आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • MRP Is 10 Times Higher Than Wholesale Rates And Millions Of Patients Are Robbed Daily; News And Live Updates

पडताळणी:होलसेल दरांपेक्षा 10 पट एमआरपी अन् रोज होतेय लाखो रुग्णांची लूट; खासगी रुग्णालये, डॉक्टर, मेडिकल स्टोअर, कंपन्यांच्या संगनमताने सुरू आहे खेळ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आपत्तीतही फार्मा कंपन्यांनी साधली संधी : ब्रँडेडच्या नावाखाली औषधांच्या किमतीत प्रचंड फरक, सरकारच्या प्रत्येक नियमावर तोड

कोरोनाकाळात लोक आपला श्वास व ऑक्सिजन पातळी मोजत होते तेव्हा फार्मा कंपन्यांनी नफेखोरीची संधी साधली. लोकांवरील ही आपत्ती औषध कंपन्या, मेडिकल स्टोअर संचालक, खासगी रुग्णालये व काही डॉक्टर्ससाठी मोठी संधीच ठरली. औषधे होलसेल रेटपेक्षा १० पटींपर्यंत एमआरपी लावून विकण्यात आली. कोरोनाच्या उपचारांत रेमडेसििवर इंजेक्शनचा खूप वापर झाला. हेट्रो कंपनीच्या एका इंजेक्शनची एमआरपी ५,४०० तर होलसेल किंमत १,९०० रुपये होती. त्याच्या ६ इंजेक्शनचा कोर्स ३२,४०० रुपयांत पडला. ८०० रु. एमआरपीच्या कॅडिलाचे ६ इंजेक्शनच्या पूर्ण कोर्सची किंमत फक्त ४,८०० रुपये होती.

म्हणजे एकाच आैषधाच्या दरांत २७,६०० रुपयांचा फरक. सिप्लाचे अँटिबायोटिक इंजेक्शन मेरोपॅनमच्या १० डोसची किंमत ३६,००० रुपये आहे. मायलान फार्माची इतकीच इंजेक्शन ५,००० रुपयांत मिळतात. म्हणजे ३१ हजार रुपयांचा फरक. ट्रायोका फार्माच्या याच अँटिबायोटिक इंजेक्शनवर एमआरपी २,४०० रुपये असली तरी त्याचा होलसेल रेट फक्त २२१ रु. आहे. औषधांच्या होलसेल व एमआरपीतील या फरकातील लुटीचा हा वृत्तांत..

मोठा प्रश्न... एकच औषध बनवण्याचा खर्च एकसारखा, तर त्याचे दर वेगवेगळे का असावेत?
कंपन्या का टाकतात मनमानी एमआरपी?

पीएम जनऔषधी केंद्राला औषध पुरवठा करणाऱ्या एका कंपनीचे मालक अनैतिक नफेखोरी होत आहे, याला दुजोरा देतात. ते म्हणाले,‘आम्ही औषधी केंद्र आणि कंपन्या दोघांना एकाच दराने औषधे देतो. पण कंपन्या मनमानीपणे एमआरपी टाकतात आणि अनेक पट महाग दराने विकतात. असे का?’

जनऔषधी केंद्रांवर एमआरपी जास्त का?
मेडिकल अॅक्टिव्हिस्ट डॉ. पीयूष जोशी म्हणाले की, ‘देशातील ८००० पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रे जेव्हा २० ते ८० % पर्यंत सूट देण्याचा दावा करतात, तर मग त्यांच्या औषधांवरही एवढी जास्त एमआरपी का आहे? खरी किंमत का नाही? म्हणजेच येथेही औषध माफियांची घुसखोरी आहे हे स्पष्ट आहे.’

नाव बदलले, औषध ‘मूल्य नियंत्रण’ यादीतून होते बाहेर
औषधांच्या किमतीवर नियंत्रण आणि निगराणी नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटी करते. ते बहुतांश नियंत्रित वर्गातील सिंगल मॉलिक्यूल औषधांची एमआरपी ठरवते. कंपन्या त्याचाच फायदा घेतात. उदा. कोविड-१९ च्या उपचारात दिलेले अँटिबायोटिक डॉक्सिसायक्लिन. कंपन्यांनी त्याचे कॉम्बिनेशन ड्रग बनवले, नाव बदलले आणि ते मूल्य नियंत्रण यादीतून बाहेर पडले. अॅसिडिटीच्या ‘अॅसिलॉक’ या जुन्या, स्वस्त औषधाचे प्रकरणही असेच आहे.
कोरोनाची ही औषधे सर्वांनी घेतली, १ आठवड्याचा कोर्स, ५००% नफा

 • औषध ब्रँडेड जेनेरिक डॉक्सिसायक्लिन 90 9
 • अजिथ्रोमायसिन (5) 120 45
 • आयव्हरमेक्टिन (10) 200 12
 • व्हिटॅमिन सी/झिंक 140 60
 • व्हिटॅमिन डी (4 गोळ्या) 130 20
 • स्टेरॉइड (10 गोळ्या) 100 20
 • एकूण किंमत 780 166

कंपनी एक, जेनेरिक-ब्रँडेड औषधांच्या होलसेल दरात मोठा फरक
दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातच्या औषध बाजारांच्या पडताळणीत असे समोर आले की, ब्रँडेड औषधांच्या नावावर फार्मा कंपन्या दर १००० ते १५००% पर्यंत वाढवतात. मोठ्या कंपन्या स्वत: ब्रँडेड आणि जेनेरिक औषधे वेगवेगळ्या किमतीत काढतात. ब्रँडेडमध्ये २०% मार्जिन अाहे, तर ब्रँडेड जेनेरिकमध्ये ८०% पर्यंत मार्जिन आहे. उदाहरणार्थ सिप्ला कंपनीची ब्रँडेड अँटिबायोटिक ओमनिक्स-ओची एमआरपी १७५ रु. आहे, ती रिटेलरला २०% कमी म्हणजे १४० रु. त मिळते. सिप्लाची हीच गोळी सेफिक्स-ओ या नावानेही तयार होते. त्यावर एमआरपी तर ब्रँडेडपेक्षाही जास्त २२० रु. असते, पण १० गोळ्यांचा होलसेल दर फक्त ५२ रुपये आहे.

आयएमएचा तर्क : केंद्र सरकारने ब्रँडेड औषधांची सिस्टिम बंद करावी
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल म्हणाले की, ‘सरकारने ब्रँडेड औषधांची सिस्टिम बंद करावी. ब्रँड प्रमोशनच लुटीचा पाया आहे.’ ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव राजीव सिंघल म्हणाले की, ‘होलसेलर, औषध दुकानांचे ३५% मार्जिन जोडून एमआरपी टाकण्यात यावी.’

बातम्या आणखी आहेत...