आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mucormycosis Is Better Known By Its Original Name Rather Than The Color Of The Fungus Dr. Guleria

फंगस:म्यूकरमायकोसिसला बुरशीच्या रंगापेक्षा मूळ नावानेच ओळखणे योग्य - डॉ. गुलेरिया

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड बाधित रुग्णांमध्ये आढळणारा बुरशीजन्य संसर्ग बहुतेकदा म्यूकरमायकोसिस असतो

म्यूकरमायकोसिस हा कोविड-१९ संसर्गावर उपचार घेऊन रोगमुक्त झालेल्या किंवा सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये आढळणारा सर्वसामान्य बुरशीजन्य आजार आहे. या आजाराने बाधित व्यक्तींची संख्या वाढताना दिसत असली तरी हा संसर्गजन्य म्हणजे कोविड-१९ सारख्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरणारा आजार नाही. नवी दिल्ली येथील एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी साेमवारी पत्र सूचना कार्यालयाच्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात माध्यम प्रतिनिधींना संबोधित करताना ही माहिती दिली.

डॉ. गुलेरिया म्हणाले की म्यूकरमायकोसिसबद्दल बोलताना त्याला काळ्या बुरशीचा संसर्ग असे संबोधन वापरणे योग्य नाही. कारण, त्यामुळे अनेक गैरसमज पसरू शकतात. ‘काळी बुरशी ही वेगळी जीवशास्त्रीय शाखा आहे, पांढऱ्या बुरशीच्या पसरलेल्या वाढीत या बुरशीचे काळे ठिपके दिसल्यामुळे हे नाव म्यूकरमायकोसिसशी जोडले गेले आहे. सर्वसामान्यपणे, बुरशीजन्य आजाराचे अनेक प्रकार आहेत. उदा. कँडिडा, अॅस्परजिलॉसिस, क्रिप्टोकोकस, हिस्टोप्लाझमॉसिस आणि कॉकायडीओडोमायकॉसिस. म्यूकरमायकोसिस, कँडिडा आणि अॅस्परजिलॉसिस हे प्रकार कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतात.

या संसर्गाच्या प्रसाराबद्दल बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, ‘कँडिडा बुरशीचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाच्या तोंडात, मुख पोकळीत आणि जिभेवर पांढरे चट्टे दिसून येतात. हा आजार व्यक्तीच्या गुप्त अवयवांनासुद्धा संसर्ग करतो तसेच रक्तातदेखील सापडतो (अशा प्रसंगी हा आजार गंभीर स्वरूप घेतो). अॅस्परजिलॉसिस बुरशीचा आजार फारसा दिसून येत नाही. हा आजार फुप्फुसांवर आक्रमण करून फुप्फुसांमध्ये पोकळ्या निर्माण करतो. कोविड-१९ बाधित रुग्णांमध्ये दिसणारा आजार हा बहुतांश वेळा म्यूकरमायकोसिस आहे, अॅस्परजिलॉसिस आजार झालेला रुग्ण क्वचितच दिसतो तर कँडिडा काही लोकांमध्ये आढळून येतो. म्युकरमायकोसिसने बाधित झालेल्या आणि गंभीर धोक्याच्या छायेत असलेल्या लोकांबद्दल बोलताना ते म्हणाले की म्यूकरमायकोसिस झालेले ९०% ते ९५% रुग्ण एकतर मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि/किंवा स्टिरॉइड्स घेत आहेत. ज्या व्यक्ती मधुमेही नाहीत किंवा स्टिरॉइड्सचे सेवन करीत नाहीत अशा व्यक्तींमध्ये हा आजार क्वचितच दिसून येतो.

लक्षणे अाढळल्यास डाॅक्टरांशी त्वरित संपर्क साधा
त्यांनी असेही नमूद केले की जे रुग्ण उच्च-जोखमीच्या श्रेणीत आहेत म्हणजेच त्यांचा मधुमेह अनियंत्रित आहे आणि कोविड पॉझिटिव्हची लक्षणे दिसत आहेत त्यांनी त्वरित त्यांच्या डॉक्टरांना याबाबत माहिती द्यावी. उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा स्टिरॉइड घेणाऱ्या व्यक्तींमध्ये डोकेदुखी, नाकातून रक्त येणे, डोळ्याच्या खाली सूज येणे, चेहऱ्याची संवेदना कमी होणे अशा प्रकारची म्यूकरमायकोसिसचा इशारा देणारी लक्षणे आढळल्यास त्यांनी डॉक्टरांना त्याबाबत त्वरित कळवणे आवश्यक आहे. म्हणजे लगेच निदान आणि उपचार केले जाऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...