आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांनी वाढदिवस साजरा करू नये:देवबंदचे उलेमा म्हणाले - कुराण, इस्लाम, शरियतमध्ये याचा उल्लेख नाही

सहारनपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिमांनी वाढदिवस साजरा करणे चुकीचे असल्याचा दावा सहारनपूरमध्ये देवबंदचे उलेमा मुफ्ती असद कासमी यांनी केला आहे. कुराण, इस्लाम, शरियत व हदीसमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा उल्लेख नाही. वाढदिवस साजरा करण्याची पद्धत ख्रिश्चन धर्माची आहे. त्याचा सध्या मुस्लिमांनी स्वीकार केला असून, ते चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

मुफ्ती असद कासमी म्हणाले, 'मुस्लिमांनी ख्रिश्चन परंपराचे पालन करू नये. जन्मदिवस साजरा करणे वाईट आहे. मी इस्लाम, शरियत, कुराण व हदीसविषयी वाचले आहे. कुठेही कुराण किंवा हदीस ए नबीमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा उल्लेख नाही. ख्रिश्चन लोक वाढदिवस साजरा करतात. त्यांची नक्कल मुस्लिम करत आहेत. मुस्लिमांनी हे टाळले पाहिजे.

हे छायाचित्र देवबंद उलेमा मुफ्ती असद कासमी यांचे आहे. त्यांनी मुस्लिमांनी वाढदिवस साजरा करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
हे छायाचित्र देवबंद उलेमा मुफ्ती असद कासमी यांचे आहे. त्यांनी मुस्लिमांनी वाढदिवस साजरा करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

'अल्लाहच्या रसूलनेही वाढदिवस साजरा केला नाही'

मुफ्ती पुढे म्हणाले, 'अल्लाहचे रसूल हजरत मोहम्मद साहेबांनी उभ्या आयुष्यात आला वाढदिवस साजरा केला नाही. पण मुस्लिमांनी माहिती नाही कोणते हदीस वाचून वाढदिवस साजरा करणे सुरू केले. शरियतमध्ये वाढदिवसाचा कोणताही उल्लेख नाही. त्यानंतरही काही मुस्लिमांनी शरियतमध्ये ही नवी गोष्ट निर्माण केली आहे. मुस्लिमांनी आपल्या शरियतवर अटळ राहिले पाहिजे.' मुफ्ती असद कासमी यांनी यावेळी मुस्लिमांना शरियतमध्ये नसलेल्या गोष्टी न करण्याचे आवाहन केले.

डीजे वाजणाऱ्या ठिकाणी मौलवींनी निकाह लावू नये

मुस्लिमांनी आपल्या लग्नांत बँड बाजा, आतशबाजी, घोडस्वारी व डीजे वाजवण्यापासून दूर राहिले पाहिजे. निकाही मशिदीत केला पाहिजे. निकाह इस्लामी परंपरेनुसार होईल याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. मी नुकतेच नोएडातील उलेमांनी इस्लाम व शरियतला डावलून केल्या जाणाऱ्या निकाहाला न जाण्याचा निर्धार केला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो, असेही मुफ्ती यावेळी म्हणाले.

इस्लामी शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे देवबंद

हे छायाचित्र सहारनपूर देवबंदचे आहे. ते इस्लामी शिक्षणासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
हे छायाचित्र सहारनपूर देवबंदचे आहे. ते इस्लामी शिक्षणासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

दिल्लीहून 150 किमी अंतरावर देवबंद आहे. ते उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात येते. येथे 30 मे 1866 रोजी दारूल उलूमची स्थापना झाली. त्याचा उद्देश मुस्लिमांना इस्लामी शिक्षण देण्याचे आहे. यासाठी ते आज जगभरात ओळखले जाते. हे केवळ इस्लामी विद्यापीठच नव्हे तर एक विचारधारा आहे. या विचारधारेने प्रभावित मुस्लिमांना देवबंदी म्हटले जाते. देवबंदमध्ये आज लहान-मोठे जवळपास 500 मदरसे व ग्रंथालय आहेत. जगभरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.

बातम्या आणखी आहेत...