आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगपती मुकेश अंबानी झाले आजोबा:मुलगी ईशाला झाली जुळी मुले; मुलीचे नाव ठेवले आदिया, तर मुलाचे कृष्णा

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून ईशा अंबानी, तिचे पती आनंद पिरामल, नीता अंबानी व मुकेश अंबानी.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आजोबा झालेत. त्यांची कन्या ईशा अंबानी यांनी शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला. यापैकी मुलीचे नाव आदिया, तर मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे. अंबानी कुटुंबाने रविवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

ईशा अंबानीचे लग्न 4 वर्षांपूर्वी उद्योगपती आनंद पिरामल यांच्याशी झाले होते. ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेलचा व्यवसाय सांभाळते. ती कंपनीच्या रिटेल बिझनेसची चेअरमनही आहे.

अंबानी व पिरामल फॅमिलीचे छायाचित्र. डावीकडून स्वाती पिरामल, अजय पिरामल, ईशा अंबानी, मुकेश अंबानी, नीता अंबानी व ईशाचे पती आनंद पिरामल.
अंबानी व पिरामल फॅमिलीचे छायाचित्र. डावीकडून स्वाती पिरामल, अजय पिरामल, ईशा अंबानी, मुकेश अंबानी, नीता अंबानी व ईशाचे पती आनंद पिरामल.

मुकेश अंबानींच्या कुटुंबात आता 3 छोटी मुले झाली आहेत. त्यांचा मुलगा-सून आकाश व श्लोकाला एक मुलगा आहे. त्याचे नाव पृथ्वी आहे. मुकेश अंबानी अनेकवेळा त्याच्यासोबत रमताना दिसून येतात.

नीता व मुकेश अंबानी 15 ऑगस्टच्या सोहळ्यात आपला नातू पृथ्वीसोबत दिसून येत आहेत.
नीता व मुकेश अंबानी 15 ऑगस्टच्या सोहळ्यात आपला नातू पृथ्वीसोबत दिसून येत आहेत.

ईशाचे पती आनंद पिरामलही उद्योगपती

आनंद पिरामल एक उद्योगपती आहेत. ते पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल व स्वाती पिरामल यांचे सुपुत्र आहेत. ते यूनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलव्हेनियाचे अर्थशास्त्रातील पदवीधर आहेत. त्यांनी हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमधूनही बिझनेस एडमिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. सध्या ते पिरामल ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत.

आनंद पिरामल ‘इंडियन मर्चेंट चेम्बर’च्या यूथ विंगचे सर्वात तरुण अध्यक्ष होते. काही काळापूर्वीच त्यांनी 2 स्टार्टअप्स सुरू केलेत. एक- पिरामल ई-आरोग्य व दोन- पिरामल रिएल्टी. पिरामल ई-आरोग्य एका दिवसात जवळपास 40 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करत आहे.

ईशा रिलायन्स रिटेलची संचालक

ईशा अंबानी सर्वप्रथम वयाच्या 16 व्या वर्षी चर्चेत आल्या होत्या. तेव्हा त्या सर्वात कमी वयाच्या अब्जधीश वारसदारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होत्या. ईशा रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडसाठी डिजिटल, जाहिराती, कम्यूनिकेशन व क्रिएटिव्हसह मार्केटिंग टीम्ससाठी स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट व त्यांची अंमलबजावणी पाहत होत्या.

2016 मध्ये फॅशन पोर्टल Ajio च्या लाँचिंगचे श्रेयही ईशालाच दिले जाते. मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच जिओच्या लाँचिंगमागे ईशाची प्रेरणा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आकाश अंबानींनाही ब्रँडिंग व कंझ्यूमरशी संबंधित निर्णय घेण्यात मदत केली आहे.

खाली दिलेल्या ग्राफिक्समध्ये अंबानी कुटुंबाची माहिती समजून घेता येईल.

खाली तुम्हाला ईशा व आनंदच्या लग्नाचे फोटो पाहता येतील...

ईशा अंबानी आपले पती आनंद पिरामल यांच्यासोबत. दोघांचे लग्न मुंबईत 4 वर्षांपूर्वी झाले होते.
ईशा अंबानी आपले पती आनंद पिरामल यांच्यासोबत. दोघांचे लग्न मुंबईत 4 वर्षांपूर्वी झाले होते.
लग्नात ईशा व आनंद पिरामल.
लग्नात ईशा व आनंद पिरामल.
लग्नाच्या विधीदरम्यान ईशा व आनंद. आनंद देखील एक उद्योगपती असून, पिरामल ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत.
लग्नाच्या विधीदरम्यान ईशा व आनंद. आनंद देखील एक उद्योगपती असून, पिरामल ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत.

बातम्या आणखी आहेत...