आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स समुहात मुकेश अंबानींनंतर कोण?:वारस ठरवण्यासाठी तयार करणार फॅमिली काउंसिल ; ईशा, आकाश आणि अनंतजवळ असणार पूर्ण जबाबदारी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काउंसिलमध्ये मुकेश अंबानींचे तिन्ही मुलं ईशा, आकाश आणि अनंत यांना उत्तराधिकारी बनवण्यात येईल
  • या काउंसिलमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना बरोपरीचे प्रतिनिधित्त्व मिळेल

देशातील सर्वात मोठे कॉर्पोरेट घराने रिलायन्स इंडस्ट्रीज समुहामध्ये आता भविष्यातील उत्तराधिकारीविषयी तयारी सुरू झाली आहे. आता कंपनीचे मालक मुकेश अंबानी फॅमिली काउंसिल बनवून येणाऱ्या काळात आपल्या मुलांसाठी सर्व काही स्पष्ट ठेवू इच्छिता. या काउंसिलमध्ये अंबानी ज्या लोकांना उत्तराधिकारी बनवणार आहेत, त्यामध्ये त्यांचे तिन्ही मुलं आकाश, अनंत आणि ईशा अंबानी असणार आहेत. यामध्ये एक बाहेरचा व्यक्तीही असेल. जो मेंटर आणि सल्लागाराच्या रुपात काम करेल. देशाचे कॉर्पोरेट घराण्यामध्ये हे पहिलीच वेळ आहे, जे पहिलेच सर्व काही ठरवत आहेत.

...कारण त्यांच्या कुटुंबात होऊ नयेत वाद

कंपनीची स्थापना करणारे धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर जे झाले होते. ते कारण लक्षात घेऊनच मुके अंबानींनी ही योजना आखली आहे. त्यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानींमधील वाद पूर्ण जगाने पाहिला आणि दोन्ही भाऊ वेगळे झाले. यामुळे मुकेश अंबानींना पहिलेच सर्व काही ठरवून घ्यायचे आहे. 63 वर्षीय अंबानी जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिझनेसमन आहेत. त्यांची संपत्ती 80 अरब डॉलरपेक्षा जास्त आहे. या योजनेमागे सहजतेने बिझनेस चालवण्याचा उद्देश आहे. अशाप्रकारे त्यांचा व्यवसाय नेहमीच कोणत्याही कौटुंबिक कलहाशिवाय सुरू राहिल.

कुटुंबातील सर्व सदस्य काउंसिलमध्ये होणार सामिल

लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, अंबानी हा निर्णय घेण्याचा विचार करत आहेत कारण रिलायन्स बिझनेस अंपायरसाठी उत्तराधिकारी ठरवता येऊ शकेल. या काउंसिलमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना समान वाटा मिळणार आहे. यामध्ये अंबानींचा मुलगा आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि मुलगी ईशा अंबानीचा समावेश असेल.

काउंसिलमध्ये कुटुंबाव्यतिरिक्त एक सदस्य बाहेरचा असणार

वृत्तानुसार, काउंसिलमध्ये कुटुंबाबाहेरचा एक सदस्यही सामिल असणार आहे. जो मेंटर आणि सल्लागाराचे काम करेल. मात्र, सध्या यावर रिलायन्स इंडस्ट्रीजने कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या संपत्तीमुळे झाला आहे वाद

भारतातील सर्वात मोठे उद्योगपतींमध्ये एक धीरूभाई अंबानींच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये व्यापाराच्या वाटणीवरुन मोठा संघर्ष झाला होता. मुकेश अंबानी आणि त्यांचे भाऊ अनिल अंबानी यांच्या रिलायन्सच्या संपत्ती संदर्भात दिर्घकाळ वाद सुरू होता. एवढेच नाही तर दोन्ही भावांमध्ये बोलणेही बंद झाले होते. त्यांच्यासोबत जे झाले ते त्यांच्या मुलांसोबत होऊ नये अशी मुकेश अंबानींची इच्छा आहे.

जून 2005 मध्ये मुकेश आणि अनिल अंबानींमध्ये झाली होती वाटणी

मुकेश अंबानी 1981 आणि अनिल अंबानी 1983 मध्ये रिलायन्सची जोडले गेले. जुलै 2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी रिलायन्स ग्रुपचे चेअरमन बनले. अनिल मॅनेजिंग डायरेक्टर बनले. नोव्हेंबर 2004 मध्ये पहिल्यांदाच मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यातील भांडण समोर आले. जून 2005 मध्ये दोघांच्या वाटण्या झाल्या होत्या. मात्र कोणत्या भावाला कोणती कंपनी मिळेल? याचा वाटा 2006 पर्यंत होऊ शकला होता. दोन्ही भावांमधील वाद जवळपास 4 वर्षे सुरू होता.

बातम्या आणखी आहेत...