आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना श्रीमंताच्या यादीत मागे टाकले आहे. 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांच्या संपत्तीत 164 दशलक्ष वाढीसह 0.19 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर अंबानींनी अदानींना मागे टाकले. तर फोर्ब्सच्या रिअल टाइम अहवालानुसार उद्योगपतींची संपत्ती युएसडी 84.1 अब्ज एवढी आहे. तर गौतम अदानी यांची संपत्ती 4.62 टक्क्यांनी कमी झाली आहे.
अदानी 3 वरून 10 व्या क्रमांकावर आले
जगातील अव्वल तीन अब्जाधीशांमध्ये स्थान मिळविणारे अदानी हे मुकेश अंबानींच्या अगदी खाली 10 व्या क्रमांकावर आले आहेत. या यादीत प्रथम स्थानावर आहेत. 2022 मध्ये बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलन मस्क यांना मागे टाकले. तथापि, या मूल्यांमध्ये सतत चढ-उतार होत असतात. अदानींच्या शेअरमध्ये वाढ झाल्यास, अदानींची वैयक्तिक संपत्तीही वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाचे कर्ज उघडकीस
हिंडेनबर्ग शोध अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांची सध्याच्या पातळीपासून घसरण होण्याची शक्यता असलेल्या उच्च मूल्यांकनामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. समूहाचे कर्ज उघड होणे ही चिंतेची बाब असल्याचेही यात म्हटले आहे. अदानी समूहाने मात्र, गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपन्यांवर मार्केट मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चच्या विरोधात यूएस आणि भारतात कायदेशीर पर्यायांवर विचार करत असल्याचे सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.