आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांची भरतीही सुरू:मुकेश अंबानी सिंगापूरमध्ये उघडणार फॅमिली ऑफिस

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी आता सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडण्याची तयारी करत आहेत. सूत्रांनुसार, अंबानी यांनी या नव्या युनिटसाठी रिअल इस्टेट प्रॉपर्टी निवडली आहे. कर्मचाऱ्यांची भरतीही सुरू केली आहे. देखरेखीसाठी व्यवस्थापकाचीही नियुक्ती केली आहे. रिलायन्स आपल्या जुन्या तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातून ई-कॉमर्स, ग्रीन एनर्जी आणि संपूर्ण भारतात आपल्या रिटेल व्यवसाय विस्ताराकडे सरसावत आहे. कमी कर आणि सुरक्षेमुळे सिंगापूर सुपर रिच लोकांत फॅमिली ऑफिससाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. याआधी हेज अब्जाधीश रे डेलियो आणि गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांनी सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडले आहे. मात्र, सिंगापूरमध्ये श्रीमंतांच्या वाढत्या संख्येमुळे कार, घर आणि अन्य वस्तूंच्या किमतीही वाढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...