आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसपच्या अफझल अन्सारींची खासदारकी रद्द:UP च्या मऊचे खासदार होते, 4 वर्षांची शिक्षा मिळाल्यानंतर 56 तासांत निर्णय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील मऊमधील बसप खासदार अफझल अन्सारी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करवण्यात आले आहे. शनिवारी त्यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांचा भाऊ माफिया मुख्तार अन्सारी यालाही गाझीपूरच्या MP/MLA न्यायालयाने गँगस्टर प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने मुख्तारला 5 लाख रुपये आणि अफझलला 1 लाख रुपये दंड ठोठावला होता. मुख्तार आधीच बांदा कारागृहात बंद आहे. तर खासदार अफझल जामिनावर होते.

2007 मध्ये गँगस्टर केस

कृष्णानंद राय यांच्या हत्येनंतर 2007 मध्ये अन्सारी बंधूंविरुद्ध गँगस्टर अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला राय यांच्या हत्येनंतर झालेल्या जाळपोळ आणि व्यापारी नंद किशोर रुंगटा यांच्या अपहरण-हत्येवर आधारित होता. कृष्णानंद राय खून प्रकरणात न्यायालयाने अन्सारी बंधूंची निर्दोष मुक्तता केली. पण, गँगस्टर अॅक्टचे हे प्रकरण याच्याशी संबंधित आहे.

23 सप्टेंबर 2022 रोजी दोन्ही भावांवर गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा निर्णय 15 एप्रिल रोजी येणार होता. मात्र, न्यायाधीश रजेवर गेल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

उच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही

अलीकडेच अफझल अन्सारी म्हणाले होते की, "आमच्याविरुद्धच्या हत्येच्या खटल्यात न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले आहे. अशा स्थितीत गँगस्टर कायद्यांतर्गत खटल्याचा कोणताही आधार नाही. आमचा न्यायालयावर विश्वास आहे." हत्या प्रकरणातून निर्दोष सुटल्याच्या आधारावर गँगस्टर केसविरोधात अफझल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही.