आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुकुंदने 70 मिनिटांमध्ये जिंकला दुहेरीचा किताब ; आयटीएफ म्हैसूर ओपन टेनिस स्पर्धा

म्हैसूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान भारताच्या बिगरमानांकित मुकुंद ससीकुमार घरच्या मैदानावर एकेरीतील किताबाची संधी हुकल्यानंतर लगेच स्वत: सावरले आणि आघाडीच्या टेनिसपटू विष्णु वर्धनसाेबत शनिवारी आयटीएफ म्हैसूर ओपन टेनिस स्पर्धेत दिमाखदारपणे दुहेरीचा किताब पटकावला. मुकुंद आणि वर्धनने पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये आपल्याच देशाच्या अव्वल मानांकित ऋत्विक आणि निक्की पुनाचावर मात केली. त्यांनी ७० मिनिटांमध्ये ६-३, ६-४ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यासह मुकुंद आणि वर्धन ही जाेडी पुरुष दुहेरीच्या विजेतेपदाची मानकरी ठरली.

पराभवामुळे अव्वल मानांकित जाेडीला दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एकेरीत पराभवामुळे मुुकंुदला दुहेरीत किताब जिंकण्याची हाेती. त्याने या गटामध्ये आपला सहकारी विष्णू वर्धनसाेबत उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. मुकुंद-विष्णूने दुहेरीच्या अंतिम आठमध्ये ७-६, ३-६, १०-७ ने फैसल-फरदीनचा पराभव केला.तिसऱ्या मानांकित ओर्लाेव्हचे पुरुष एकेरीच्या गटातील आव्हान संपुष्टात आले. त्याला उपांत्यपूर्व फेरीमध्ये आॅस्ट्रेलियाच्या आठव्या मानांकित एलिस ब्लेकने पराभूत केले.